Dog attacked : गेल्या काही दिवसात देशात कुत्र्यांनी (Dog Attack) हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गाझियाबादमध्ये (Gazhiabad) एका सोसायटीत एका लहान मुलाला कुत्र्याने चावा घेतला. गाझियाबादमध्येच गार्डनमध्ये खेळणाऱ्या एका मुलावर पीटबूल जातीच्या कुत्र्याने (Pitbull Dog) हल्ला केला होता, यात मुलाच्या चेहऱ्यावर दीडशे टाके पडले. तर लखनऊमध्ये (Lucknow) पीटबूल जातीच्या कुत्र्याने मालकीनीवरच हल्ला करत तिची हत्या केली. या घटना ताज्या असतानाच आता केरळमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायकल चालवणाऱ्या मुलावर हल्ला
भटक्या कुत्र्यांनी मुलावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ (Video) अंगावर आणणारा आहे. केरळमधल्या कोझिकोडमधली (kerala kozhikode) ही घटना आहे. सायकल चालवणाऱ्या एका 13 ते 14 वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्याच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी मुलगा जीवाच्या आकंताने प्रयत्न करताना दिसतोय. पण कुत्र्याने त्याच्यावर हल्ला सुरुच ठेवला. मुलाने कशीबशी कुत्र्याच्या तावडीतून सुटका करत घराच्या गेटमध्ये प्रवेश केला. तेव्हा कुटे कुत्र्याने त्याला सोडलं. धक्कादायक म्हणजे घटनेच्या एक दिवस आधीच परिसरातील तीन ते चार लोकांना कुत्र्याने चावा घेतला होता. पण त्यानंतरही महापालिकेने कारवाई केली नव्हती.



कुत्र्याने त्या मुलाला अनेक ठिकाणी चावा घेतल्याने मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकवेळा अशा घटना घडूनही महापालिकेने कोणतीच कारवाई न केल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत.