Shocking News : मध्य प्रदेशातील इंदूरमधील सिलिकॉन सिटीमध्ये राहणाऱ्या अकरावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत मुलीचे वडिल हे डॉक्टर होते, आणि मुलीचंही डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या मित्राबरोबर कॅफेमध्ये गेली असताना या मुलीने धूम्रपान केलं होतं. यावेळी तिच्या मित्राने तिचे सिगरेट पितानाचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. त्यानंतर हा मित्र तिचे फोटो व्हायरल करण्याची सातत्याने धमकी देत होत


सततच्या धमक्यांना कंटाळून या मुलीने आपल्या वडिलांना ही गोष्ट सांगितली. यावर तिच्या कुटुंबियांनी अशी चूक होते, निराश होऊ नकोस, अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर असं सांगत मुलीला धीर दिला. अशा फोटो मुळे फारसा फरक पडत नाही असंही तिच्या वडिलांनी तिला सांगितलं. पण आपले फोटो व्हायरल होतील या भीतीने ती तणावत होती, आणि त्याच भीतीपोटी तीने टोकाचं पाऊल उचललं.


हिरण्या मालवा ही अकरावीत शिकणारी विद्यर्थिनी होती. शनिवारी रात्री तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या वेळी मुलीचे वडील आणि आई घराबाहेर गेले होते. 10 वर्षांची लहान बहीण आणि 4 वर्षांचा भाऊ इमारतीखाली खेळायला गेले होते. यादरम्यान हिरण्याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. 


हिरण्याने शनिवारी संध्याकाळी वडिलांना याची माहिती दिली. कोचिंग सुटल्यानंतर ती तिच्या मित्रांसोबत सिगारेट ओढत होती. यावेळी कोचिंग क्लासमध्ये एकत्र शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने मोबाईलमध्ये फोटो काढला. त्यानंतर तो तिला धमकावत होता.