भरमंडपात अचानक उठला नवरदेव, म्हणाला `मला फॉर्च्यूनरच हवी`; पुढे काय घडलं जाणून घ्या
संपूर्ण रात्र नवरी फेऱ्यांसाठी वाट पाहत बसली.
चंदीगड : लग्न हा प्रत्येक मुलीसाठी महत्वाचा दिवस असतो. या दिवसानंतर मुलीच्या आयुष्याची नवीन सुरूवात होणार असते. परंतु लग्नातच मुलीसोबत काही विचित्र घटना घडली तर? मुलीला ते सहनच होणार नाही. विचार करा की मुलगी चांगली शिकलेली असेल आणि फक्त हुंड्यापोटी तिचं लग्न झालं नाही तर? हुंड्याची प्रथा भारतात बॅन करण्यात आली आहे, परंतु तरी देखील काही लोकं वेगवेगळ्या मार्गाने मुलीकडच्यांकडून हुंड्यची मागणी करणं सोडत नाहीत.
अशीच एक घटना हरियाणामध्ये घडली आहे. जेथे एका पीएचडी पास तरुणी लग्नाचे फेरे न घेताच रात्रभर आपल्या होणाऱ्या नवऱ्याची वाट पाहत बसुन राहिली. हे लग्न फॉर्च्यूनर गाडीच्या मागणीमुळे थांबून राहिलं होतं.
संपूर्ण रात्र नवरी फेऱ्यांसाठी वाट पाहत बसली. सकाळी जेव्हा पोलिसांना बोलवण्यात आले. तेव्हा सकाळी ८ वाजता पोलिसांसमोर मुलाकडची लोकं फेऱ्यांसाठी तयार झाले. हे सगळं पाहाता जेव्हा मुलीकडच्यांनी मुलाच्या घरच्यांना प्रश्न केला की, या आधी आम्ही इतकी विनवणी करुन देखील तुम्ही तयार झाले नाही, आता पोलिसांना पाहिल्यानंतर लग्नाला उभे राहताय? मगतर तुम्ही भविष्यात काहीही कराल.
मुलीचे कुटुंबीय मुळचे उत्तर प्रदेशातील आहेत. त्यांनी असा आरोप केला, की जेव्हा हे लग्न ठरलं तेव्हा कोणत्याही प्रकारची हुंड्याची मागणी झालेली नव्हती.
मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, वरात आल्यानंतर विवाह सोहळा पार पडणार होता. मंडपात येऊन बसल्यानंतर मुलीकडच्यांनी होणाऱ्या जावयाला अंगठी आणि सोन्याची चैन घातली. परंतु तरी देखील काही वेळाने हा नवरदेव उठला त्याने आपल्या गळ्यातील चैन काढून फेकूण दिली.
मुलीकडच्यांना थोड्यावेळासाठी कळलंच नाही की, नक्की काय झालं. त्यानंतर मुलीकडच्यांनी अनेक विनवण्या केल्यानंतर मुलाकडच्यांनी सांगितलं की, मुलाच्या भावाला आणि मेहुण्याला देखील सोन्याची चैन हवी आहे.
मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, यासाठी त्यांनी आणखी दोन दिवस देण्याची विनंती केली. मात्र यासाठी नकार देत नवरदेवाने शिवीगाळ केली आणि फेरे घेण्यासही नकार दिला. यानंतर 20 लाख आणि फॉर्च्युनर गाडीची मागणी केली.
हे नववधू आणि नवरदेव दोघेही सरकारी नोकरीवर कार्यरत आहेत. या नववधूचे वडील एनडीआरआयमध्ये कार्यरत आहेत. मुलीचं संगोपन, शिक्षण पूर्ण करून त्यांनी तिला स्वत:च्या पायावर उभं केलं. "माझी मुलगी LLB, LLM, Ph.D आहे. ती नोकरी करते. मुलीला नवरऱ्यानं लग्नात असं सोडून गेल्यावर बापाने काय करावे?" असा सवाल नंतर बापाने केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाबद्दल सांगितलं, की घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मुलीकडील लोक गाडी, पैसे आणि दागिन्यांची मागणी केल्याचा मुलाकडच्यांवरती आरोप करत आहेत. मात्र मुलाकडचे सांगत आहेत की, त्यांचा हुंड्याला स्पष्ट विरोध आहे. ते म्हणाले की, आम्ही तर गळ्यातील चैन देखील काढून मुलीकडच्यांना परत दिली होती. मात्र यावरुनच भांडण सुरू झालं. आता या प्रकरणात चूक कोणाची याचा तपास पोलिस करत आहेत.