मुंबई : तीन वेळा किक बॉक्सिंगचा विश्वविजेता फ्रेडरिक सिनिस्ट्रा यांचे वयाच्या 41 व्या वर्षी निधन झाले. फ्रेडरिक सिनिस्ट्रा याला अंडरटेकर म्हणूनही ओळखले जात होते. फ्रेडरिक सिनिस्ट्रा कोरोना व्हायरसशी झुंज देत होता आणि त्याने ठरवले की, आपण आपल्या शारीरिक ताकदीनेच कोरोनाला हरवू. असे समजा की फ्रेडरिक सिनिस्ट्रा यांनी कोरोनाला खुले आव्हान दिले होते. ज्यामुळे त्यांनी कोरोनाला मनावर घेतले नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याने तर हे मानने सुरू केले होते की, कोरोना नावाची कोणतीही गोष्ट या जगात नाही आणि मला कोरोना काहीही करु शकत नाही. ज्यामुळे त्याने कोरोनाचे वॅक्सिनेशन देखील केले नव्हते. बर्‍याच लोकांप्रमाणे, त्याचा कोरोना विषाणू आणि त्याच्या लसीबद्दल असा विश्वास होता की, ती खरोखर फसवी आहे आणि अशा अफवांचा शारीरिकदृष्ट्या मजबूत व्यक्तीवर काहीही परिणाम होत नाही.


फ्रेडरिक सिनिस्ट्राही एकदा गंमतीने असे ही म्हटले होते की, त्याला कोरोनाशी दोन हात करावे लागले तरी तो त्याच्या वैयक्तिक ताकदीने त्याचा पराभव करेल. परंतु त्याला अखेर कोरोनासमोर हार मानावी लागली आणि ही हार त्याच्यासाठी जिवघेणी ठरली.


सर्वात शक्तिशाली व्यक्ती फ्रेडरिक सिनिस्ट्रावर कोरोनाने नोव्हेंबर महिन्यात हल्ला केला होता. अगदी सुरुवातीच्या काळातही त्याने स्वत: ला सर्वात शक्तिशाली व्यक्ती असल्याचे सांगितले.


कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे फ्रेडरिक सिनिस्ट्राची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत गेली. अखेर त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाला.


फ्रेडरिक सिनिस्ट्राला रुग्णालयात आणले असता त्याची प्रकृती इतकी बिघडली होती की, त्याला थेट आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. रूग्णालयात दाखल होण्याच्या वेळीही, त्याला स्वतःवर विश्वास होता आणि त्याने आपल्या चाहत्यांना सांगितले की. तो या आजाराला हरवून लवकरच आपल्या लोकांकडे परत येईल.


परंतु असे काही झाले नाही आणि तो कोरोनासोबतची ही लढाई हरला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला देखील आपल्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला यावर विश्वास बसत नाहीय. त्यामुळे कोरोनाला हलक्यात घेण्याची चूक तुम्ही देखील करु नका आणि सरकारने ठरवून दिलेल्या गाईडलाईन्सचे पालन करा.