मुंबई : बॉसला व्हॉट्सऍप मेसेज किंवा ईमेल पाठवण्यापूर्वी आपण 10 वेळा विचार करतो किंवा तो मेसेज 10 वेळा वाचतो कारण, बॉससमोर एखादी चूक देखील आपल्याला महागात पडू शकते. यामध्ये एक जरी शब्द इकडचा तिकडे झाला तरी देखील ते महागात पडू शकतं आणि असंच काहीसं एका कर्मचाऱ्यासोबत घडलं आहे. या कर्मचाऱ्याचा एक चुकीचा शब्द, जो त्याच्या बॉसने धरुन ठेवला आणि त्यासाठी त्याला सुनावले देखील. या चॅटचा स्क्रीनशॉर्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये हे स्पष्ट दिसत आहे की कसा तो एकशब्द बॉसचा इगो हर्ट करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा स्क्रीनशॉट एका Reddit वापरकर्त्याने शेअर केला आणि लिहिले, 'यावर तुमची प्रतिक्रिया कशी असेल? आणि 'Hey' कसं काय प्रोफेशनल नाही आहे?' असा प्रश्न उपस्थीत केला आहे.


बातमी लिहिपर्यंत या पोस्टला ५३ हजारांहून अधिक लाईक्स आणि 6.5 हजारांहून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. बहुतेक वापरकर्ते या पोस्ट खाली कमेंट करताना लिहिले की, भारतातील बॉसला नेहमी 'सर' ऐकायला आवडते, त्यामुळे हा शब्द त्याच्यासाठी चुकीचा आहे. तर काहींनी लिहिले की प्रत्येक बॉस असा नसतो.


नक्की काय घडलं?


तुम्हाला आता हा स्क्रीन शॉर्टपासून लक्षात आलं असेल की, कर्मचाऱ्याने फक्त 'Hey' हा शब्द त्याच्या बॉससाठी वापरला, ज्यामुळे त्याचा बॉस चिढला आणि त्याने कर्मचाऱ्याला प्रोफेशनल भाषा शिकवण्यासाठी सुरुवात केली.


सुरुवातीला तुम्हाला संभाषणाचा हा स्क्रीनशॉट अगदी सामान्य वाटेल. पण मेसेज वाचल्यानंतर तुम्हाला खरी समस्या समजेल.



श्रेयसच्या अरेच्या उत्तरात 'बॉस'ने लिहिले- हाय श्रेयस, माझे नाव संदीप आहे. कृपया हे वापरू नका. हे मला आक्षेपार्ह वाटते. जर तुम्हाला माझे नाव आठवत नसेल, तर फक्त हाय सह मला पाठवा. व्यावसायिक जगात ड्युड, मॅन असंही लिहू नका. त्याऐवजी Hello, Hi असे लिहिता येईल. तसेच, वरिष्ठांनी कधीही चॅप किंवा चिक लिहू नये.