Shocking News:  शालेय विद्यार्थांना सरकारतर्फे मध्यान्ह भोजन दिले जाते. मात्र, या भोजनाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असतो, असा आरोप नेहमीच केला जातो. अशात पश्चिम बंगालमध्ये यापेक्षा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील  मध्यान्ह भोजनात मेलेला साप आढळला. या पेक्षा भयानक बाब म्हणजे हेच अन्न मुलांना देण्यात आले. हे अन्न  खाऊन 16 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. सध्या या शाळकरी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वरणाच्या भांड्यात हा साप होता. या भांड्यातील डाळ अर्धी संपल्यावर हा साप दिसला.    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगालच्या बीरभूम (Birbhum) जिल्ह्यातील मयुरेश्वर परिसरात असलेल्या एका शाळेत हा प्रकार घडला आहे. मध्यान्ह भोजनाच्या भांड्यात एक साप मृतावस्थेत आढळला आणि एकच खळबळ उडाली. मृत साप असलेले अन्न खाल्याने मुलांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. शाळेतील 16 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.  या प्रकारामुळे विद्यार्थांचे पालक भयभित झाले. 


दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamta Banerjee announced chicken in mid day meal ) यांनी मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना चिकनसुद्धा दिलं जाईल, अशी घोषणा नुकतीच  केली आहे. ही घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी  होण्याआधीच मध्यान्ह भोजनात साप आढल्याने विरोधकांना आयतं कोलीत सापडले आहे (shocking snake found in mid day meal in west bengal students are hospitalised news in marathi ).


मध्यान्ह भोजनातील डाळीत सापडला साप


बीरभूम जिल्ह्यातील मयुरेश्वर परिसरातील मंडळपूर प्रायमरी शाळेत सोमवारी मध्यान्ह भोजनात हा साप सापडला. ज्या भांड्यात डाळ बनवली होती त्याच भांड्यात हा साप मृत अवस्थेत सापडला आणि एकच धावपळ उडाली. 20 मुलांना हे जेवण  देण्यात आलं होत. साप सापडताच विद्यार्थ्यांना जेवण थांबण्यास सांगितले. मात्र, तोपर्यंत 16 विद्यार्थ्यांचं जेवून झाले होतो. मृत साप असलेली डाळ खाल्ल्यामुळे 16 विद्यार्थांना विषबाधा झाली. या मुलांना उलटीचा त्रास होऊ लागला. तात्काळ या मुलांना  रामपूर मेडिकल कॉलेज येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. 


घटनेची माहिती मिळताच पालकांनी शाळेकडे धाव घेतली सध्या पालक फार चिंतेत आहेत आणि घडल्या प्रकाराबद्दल प्रचंड संताप पालकांमध्ये दिसून येत आहे . या प्रकारचा कसून तपास व्हावा अशीमागणी सध्या जोर धरत आहेत. (shocking snake found in mid day meal in west bengal students are hospitalised news in marathi )