डोंगरदऱ्यातून कार चालवणे खूप चिकरीचं काम असतं. अशा दऱ्या खोऱ्यांमधून गाडी चालणे सोपे नाही. कारण या रस्त्यांवर अवघ्या पावला पावलावर रिस्क आहे. एवढंच नव्हे तर क्षणाक्षणाला भिती आहे. जर तुम्ही नवीन ड्रायव्हर असाल तर तुम्हाला अतिशय सावधपणे कार चालवावी लागते. अनेकदा हेवी गाड्यांचे ड्रायव्हर देखील अशा भागांमध्ये अपघाताचे शिकार होतात. त्यामुळे रस्त्यांवर पूर्ण लक्ष देणे महत्त्वाचे आहे. डोंगर भागांमधून कार चालवताना एका ड्रायव्हरचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामधून ड्रायव्हरचे हाल पाहताच तुमचा जीव स्तब्ध होईल यात शंका नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओत तुम्ही सुरुवातीला पाहू शकतं की, दोन लोकं कारला मागून वरच्या बाजूला ठकलताना दिसत आहे. यावेळी ड्रायव्हर कारमध्येच बसलेला दिसतोय. पण कार मागे रिव्हर्समध्येच येचाना दिसते. त्यामुळे मागू थक्का देणारा एक मुलगा बाजूला होतो. आणि तेव्हाच ड्रायव्हरला कार कंट्रोल करणे कठीण झाले आहे. 


तुम्ही एक कार अचानक आऊट ऑफ कंट्रोल होताना पाहत आहात. कार दरीत कोसळताना दिसत आहे. या व्हिडीओ अचानक कारचं काय झालं कळत नाही. पण व्हिडीओत दोन लोकं कारला मागून धक्का देताना दिसत आहे. ड्रायव्हर देखील कार कंट्रोल करु शकत नाही. एवढ्यातच कार बेलगाम होते आणि दरीत कोसळते. या दरम्यान ड्रायव्हर देखील कारपासून बेकाबू झाल्याच दिसतं आहे. 



हा व्हिडीओ X वर व्हिडीओला @Prateek34381357 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'हे इंस्टिंट होतं की लक' अवघ्या 15 सेकंदात या व्हिडीओला 68 हजारापासून अधिक लोकांनी पाहिलं आहे.  या व्हिडीओत एका युझरने लिहिलं आहे की, कारमध्ये आणखी कुणी नव्हतं ना, तुम्ही कन्फर्म करु शकता. दुसऱ्या युझरने लिहिलं आहे की, नशिबवान आहे जो जिवंत राहिला. त्याने स्वतःला भाग्यवान समजायला हवे. 


हा व्हिडीओ अद्याप कुठचा आहे हे कळू शकलेलं नाही. काही जण हा व्हिडीओ जम्मू-काश्मिरचा असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच याबाबत अधिकृत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. पण पुन्हा एकदा अशा अवघड रस्त्यांमध्ये कार चालवणे कठीण असल्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.