Mobile Phone Blasts Like A Bomb: तुम्ही आपला बिघडलेला मोबाईल दुरुस्त करत असाल तर काळजी घ्या. मोबाईल दुरुस्तीच्या दुकानातला एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. मोबाईल दुरुस्त करत असताना अचानक स्फोट झाल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. हा स्फोट इतका भयानक होता की मोबाईलमधून आगीच्या ज्वाळा निघताना दिसत आहे. स्फोटाची ही घटना दुकातील सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) ललितपूर इथली ही घटना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत काय?
उत्तर प्रदेशमधल्या ललितपूर इथल्या एका दुकनातला हा व्हिडिओ आहे. एक मुलगा आपला बिघडलेला फोन दुरुस्त करण्यासाठी या दुकानात येतो. दुकानातील कर्मचारी मोबाईल दुरुस्त करण्यासाठी फोनमधून बॅटरी काढतो. पण त्याचवेळी फोनचा स्फोट होतो. दुकानदार आणि काऊंटरवर उभा असलेला मुलगा वेळीच बाजूला झाल्याने सुदैवाने ते बचावले. पण हा प्रकार चिंताजनक आहे. 



व्हिडिओ होतोय व्हायरल
मोबाईल स्फोटाचा (Mobile Blast) हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.  ट्विटरवर हा व्हिडिओ आतापर्यंत 15 हजार वेळा बघितला गेला आहे. मोबाईल स्फोटाचा नेमकं कारण कळलं नसलं तरी बॅटरी चार्ज करताना किंवा हाताळताना इलेक्ट्रिक उपकरणांपासून ती सुरक्षित ठिकाणी ठेवा असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.