नवी दिल्ली : मोदी सरकारने 1 जुलै रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीची घोषणा केली. यानंतर, लोकांना काही गोष्टींसाठी कमी तर काही गोष्टींसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. परंतु जीएसटीच्या नावाखाली दुकानदार अजूनही लोकांना चुना लावत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी सरकारनं नुकताच म्हटले आहे की काही दुकानदारांनी अजूनही स्वत:ला जीएसटीशी नाही जोडलं. तरी ते ग्राहकांकडून जीएसटीनुसार पैसे घेत आहेत. अशा परिस्थितीत, जर एखाद्या दुकानदाराने आपल्याकडून जीएसटीच्या स्वरूपात पैसे घेतले तर त्यांच्याकडून त्याचं निश्चित बिल मिळवा. जर त्याच्याकडे जीएसटीचं बिल नसेल तर मग त्याची तक्रार करण्याचंही आवाहन सरकारने ग्राहकांना केलं आहे.


सरकारने टीन नंबर ऐवजी जीएसटीनंबर आणला आहे. जीएसटी 15 अंकी आहे. दुकानदारांकडून मिळणाऱ्या बिलावर ते मुद्रित केलेलं पाहिजे. जर दुकानदार आपल्याला जीएसटी नंबर नसलेलं बिल देत नसेल तर त्याला जीएसटीनुसार पैसे देऊ नका आणि त्याची तक्रार करा.


याशिवाय, काही दुकानदार काही बँडेड वस्तूंवर जास्त टक्के जीएसटी लावून लोकांना फसवत आहेत. आपण जेव्हा एखादी वस्तू विकत घेता तेव्हा त्या वस्तूच्या प्राईज टॅगवर लिहिलेलं असतं की, सर्व टॅक्ससह एमआरपी किंमत. पण तरी एखादा दुकानदार टॅगवर लिहीलेल्या किंमतीनंतरही जीएसटीची रक्कम वेगळी मागत असेल तर तो तुम्हाला फसवत आहे.