नवी दिल्ली : महरौली विधानसभा क्षेत्रातून विजय मिळवलेल्या आप नेता नरेश यादल यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला. विजयाचा जल्लोष करत असताना दोघांवर गोळीबार करण्यात आला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दुसरी व्यक्ती जखमी झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेश यादव यांचा ताफा महिपालपुरकडे जात असताना ही घटना घडली. घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यांचा तपास सुरू आहे. 11 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला. यामध्ये नरेश यादव एकूण 62,417 मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजप कुसुम खत्री यांचा पराजय करून विजय मिळवला. कुसुम खत्री यांचा 44,085 मतांनी पराजय झाला. 



अरूणा आसफ अली मार्गावर हा गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक मान या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक कार्यकर्ता जखमी झाला आहे.




हा अपघात तेव्हा झाला जेव्हा आमदार नरेश यादव विजयानंतर मंदिरातून बाहेर येत होते. 'मला हल्ल्याचं कारण माहित नाही. पण हे अचानक झालं. जवळपास चार राऊंड फायरिंग करण्यात आलं, अशी माहिती आमदार नरेश यादवांनी दिली आहे.'