Shraddha murder case: श्रद्धा वालकर मर्डर (Shraddha Walker) केसमुळे संपूर्ण देश हादरला आहे. दररोज उलघडत चाललेल्या या मर्डर मिस्ट्रीबाबत (Murder Mystery) नवनवीन खुलासे होत असल्याचं पहायला मिळतंय. श्रद्धा आणि तिचा बॉयफ्रेंड आफताब (Aftab Poonawalla) दिल्लीतील मेहरौली भागात लिव्ह इन पार्टनर म्हणून राहत होते. लग्नासाठी तगादा लावल्यामुळे आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. एवढंच नाही तर तिचे 35 तुकडे देखील केले आणि फ्रिजमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवलं. अंगावर काटा आणणाऱ्या या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. (Shraddha murder case Accused Aftab searched many things on google after killing)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफताब अमीन पुनावाला (Aftab Amin Punawala) असं आरोपीचं पुर्ण नाव... आफताबची क्रुरता पाहून सर्वांना हादरा बसलाय. या प्रकरणात पोलीस वेगवेगळ्या अॅगलने तपास करत असल्याचं दिसतंय. पोलीसांनी या प्रकरणात आयटी विभागाची देखील मदत घेतली आणि नवा खुलासा केला आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब गुगलवर (Google Search) नेमकं काय सर्च करत होता?, यावर पोलिसांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे.


आरोपी आफताबने हत्या केल्यानंतर गुगलवर रक्त कसं स्वच्छ करावं? त्यासाठी काय वापरायचं? याबद्दल सर्च केलं होतं. याशिवाय आफताबने गुगलवर मानवी शरीराबाबत काही गोष्टी सर्च केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिली आहे. गुगलवर मानवी शरिराच्या रचना जाणून घेतली आणि श्रद्धाचे तुकडे केले होते, अशी माहिती देखील दिल्ली पोलिसांनी दिली आहे.


आणखी वाचा - धक्कादायक ! ही वेब सीरीज पासून आफताबने आखली श्रद्धाच्या हत्येची योजना


दरम्यान, गुगलने दाखवण्यात आलेल्या केमिकलचा वापर करून त्यानं जमिनीवरील रक्त साफ केलं. तर त्याने त्यानंतर 35 तुकडे ठेवलेला फ्रीज (fridge) देखील स्वच्छ केला. श्रद्धाच्या वडिलांकडून तक्रार केल्यानंतर पोलीस10 नोव्हेंबर पासून तपास करत होते. अखेर पोलिसांच्या तपासात आफताबने हत्या केल्याची कबुली दिली आहे.