Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरण उजेडात आल्यानंतर आता जवळपास महिना उलटून गेला आहे. पण पोलिसांच्या हाती अजूनही ठोस पुरावा सापडलेला नाही. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. श्रद्धा वालकर (Sharaddha Walkar) आणि आरोपी आफताब पुनावाला (Aaftab Poonawala) हे दिल्लीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) रहात होते. आफताबने श्रद्धाची हत्या करुन तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. श्रद्धाच्या हत्येनंतर तब्बल सहा महिन्यांनी हे प्रकरण उघडकीस आलं. याप्रकरणी आफताबला अटक करण्यात आली. पण आफताब पोलिसांच्या प्रश्नांना सातत्याने उलटसुलट उत्तर देत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रद्धा हत्याप्रकरणात हॉलीवूड कनेक्शन
रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं आफताब सांगत असला तरी खूप विचारपूर्वक त्याने हा कट रचला होता. पोलिसांना चकवा देण्यासाठी आफताबने जगभरात सर्वाधिक गाजलेला खटला पाहिला होता. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने हॉलीवूडचा (Hollywood) प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) आणि एम्बर हर्ड (Amber Heard) यांचा खटला अनेकवेळा वाचला, तसंच इंटरनेटवर (Internet) या खटल्याची सुनावणी लाईव्ह पाहिली. त्यानंतर आफताबने सर्व डावपेच तयार केले.


पोलीस तपासात झाला खुलासा
श्रद्धा हत्या प्रकरणात पोलीस प्रत्येक घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी जेव्हा आफताबची इंटनरनेट सर्च हिस्ट्री पाहिली तेव्हा श्रद्धाची हत्या करण्यासाठी आफताबने जगातील सर्वात गुंतागुंतीचं प्रकरण पाहिल्याचं समोर आलं. त्यामुळेच तपासादरम्यान आफताब दोन्ही राज्यांच्या पोलिसांच्या प्रश्नांना अगदी सहज उत्तर देत होता. श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी मुंबई पोलीस स्थानकात दाखल केली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आफताबला ताब्यात घेतलं. पण आफताबने श्रद्धा आपल्याला सोडून गेल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनीही त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला सोडून दिलं होतं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. पण दिल्ली पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांनाही गुंगारा देण्यात आफताब यशस्वी ठरतोय.


हे ही वाचा : इथं ओशाळाली माणुसकी! 20 मिनिटं तो रस्त्यावर तडफडत होता, लोकं आजूबाजूने जात होती... अखेर


आफताब शातिर खेळाडू
आफताबच्या इंटरनेट सर्च हिस्ट्रीचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसही हैराण झाले आहेत. आफताबने आधीच आपली रणनिती तयार करुन ठेवली होती. त्यामुळेच आफताबाची तीनवेळा पॉलीग्राफ टेस्ट आणि दोन वेळा नार्को टेस्ट झाल्यानंतरही श्रद्धा हात्याप्रकरणात पोलिसांच्या हाती ठोस पुरावा लागलेला नाही. दरम्यान, श्रद्धा हत्याप्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरु शकणार मोबाईल आणि श्रद्धाचं शीर अजूनही पोलिसांच्या हाती लागलेलं नाही. श्रद्धाचा मोबाईल त्याने समुद्रात फेकल्याची शक्यात पोलिसांनी वर्तवली आहे.