Shraddha Murder Case: देशाला हादवणाऱ्या श्रद्धा हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपी आफताब अमीन पुनावाला (Aaftab Amin Poonawala) याने श्रद्धा वालकरची  (Shraddha Walker) हत्या केल्याचं कबूल केलं आहे. पण तोच आरोपी आहे हे सिद्ध करण्याचं आव्हान पोलिसांसमोर (Delhi Police) आहे. आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते मेहरौलीच्या जंगलात (Mehrauli Forest) वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. आता पोलीस त्या तुकड्यांचा शोध घेत असून आतापर्यंत 13 तुकडे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांसमोर मोठं आव्हान
पण अजूनही पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. कारण पोलिसांना अद्याप श्रद्धाचं शीर सापडलेलं नाही, तसंच तिचा मोबाईल फोन (Mobile Phone) आणि ज्या हत्याराने त्याने श्रद्धाचे तुकडे केले होते, ते शस्त्रही पोलीसांची हाती लागलेलं नाही. आफताब आणि शद्धा लीव इन रिलेशनशीपमध्ये (Live in Relationship) रहात होते. 18 मे ला दोघांमध्ये भांडण झालं आणि आफताबने श्रद्धाची हत्या केली. हत्येनंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले.


या गोष्टी ठरणार महत्वाचे पुरावे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आफताब वारंवार आपला जबाब बदलत असून चौकशीली सहकार्य करत नाहीए. त्यामुळे पोलीस आता त्याची नार्को टेस्ट (Narco Test) करणार आहेत. या संपूर्ण प्रकणात काही व्यक्ती अशा आहेत ज्यांची साक्ष महत्वाची ठरू शकते. 


पहिला साक्षीदार - डॉक्टर अनिल कुमार
18 मेला आफताबने श्रद्धाची हत्या केली आणि तिच्या शरीराचे तुकडे केले. तुकडे करत असताना आफताबचा हात कापला गेला. त्यावर उपचार करण्यासाठी आफताब डॉक्टर अनिल कुमार यांच्याकडे गेला होता. फळ कापत असताना हात कापला गेल्याचं त्याने डॉक्टर अनिल कुमार यांना सांगितलं. डॉ. अनिल यांनी आफताबची ओळख पटवली आहे. 18 मेच्या रात्री आफताब उपचारासाठी आला असल्याचं त्यांनी सांगितलं.


दुसरा साक्षीदार - रजत शुक्ला
रजत शुक्ला हा श्रद्धाचा चांगला मित्र आहे. 2018 पासून श्रद्धा आणि आफताब रिलेशनशिपमध्ये आहेत. पण गेल्या काही महिन्यांपासून आफताब श्रद्धाला मारहाण करत असल्याचं तिने रजतला सांगितलं होतं. आफताबला तिला सोडायचं होतं, पण काही कारणामुळे ती त्याच्यापासून दूर जाऊ शकत नव्हती. दिल्लीत शिफ्ट झाल्यापासून शद्धाशी संपर्क जवळपास बंद झाल्याचं रजतने म्हटलं आहे. 


तिसरा साक्षीदार - लक्ष्मण नादिर
श्रद्धाचा आणखी एक मित्र लक्ष्मण नादिर यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यापासून श्रद्धा कोणत्याही मेसेजला रिप्लाय करत नव्हती. तिचा फोनही स्विच ऑफ होता. तेव्हाच काहीतरी गडबड असल्याचं मला वाटलं आणि मी श्रद्धाच्या भावाच्या कानावर ही गोष्ट सांगितल्याचं लक्ष्मणने म्हटलं आहे. श्रद्धाशी शेवटचं बोलणं जुलैमध्ये झाल्याचंही लक्ष्मणने म्हटलं आहे. शेवटचं बोलणं झालं त्यावेळी श्रद्धाने आफताब मला मारुन टाकेल, मला इथून दूर जायचं आहे, असं तीने सांगितल्याचंही लक्ष्मणने सांगितलं.


चौथा साक्षीदार -  सुदीप सचदेवा
आफताबने ज्या दुकानातून धारदार शस्त्र विकत घेतलं त्या दुकानाच्या मालकाचं नाव सुदीप सचदेवा आहे. पोलीस आफताबला घेऊन त्या दुकानात गेले होते. सचदेवानेही आफताबला ओळखलं. 


पाचवा साक्षीदार - तिलक राज
श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर ते ठेवण्यासाठी आफताबने 300 लीटरचा नवा फ्रीज विकत घेतला. हा फ्रीज आफताबने तिलक राज यांच्या दुकानातून विकत घेतला होता. तिलक राज यांनी दिलेल्या माहिती नुसार आफताबने हा फ्रीज 25 हजार 300 रुपयांना विकत घेतला होता. 


पाणी बिल आणि रेंट अॅग्रीमेंट
दिल्ली सरकार प्रत्येक घरासाठी 20 हजार लीटर पाणी मोफत देत. पण यानंतरही आफताबला अतिरिक्त पाणी वापरल्याचं 300 रुपयांचं बील आलं. म्हणजेच त्याने 20 हजार लीटर मोफत पाण्याव्यतिरिक्त अतिरक्त पाण्याचा वापर केला होता. श्रद्धाची हत्या केल्यानतंर रक्ताचे डाग घालवण्यासाठी आफताब पाण्याचा वापर करत होता. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आफताब रोज पाण्याची टाकी तपासत होता.


आफताबने छतरपूरमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. रेंट अॅग्रीमेंचवर आफताबने श्रद्धाचं नाव टाकलं होतं. या फ्लॅटचं भाडं 9 हजार रुपये इतकं होतं, आणि दर महिन्याच्या 8 ते 10 तारखेदरम्यान आफताब ऑनलाईन भाडं भरत होता. 18 मेला श्रद्धाची हत्या झाली, त्याच्या काही दिवस आधीच आफताबने हा फ्लॅट भाड्याने घेतला होता.