Shraddha Walker Murder Case: साऱ्या देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणात (Shraddha Walker Murder) रोज नवीन अपडेट समोर येत आहे.  या प्रकरणी दररोज नवनवीत खुलासे होत असून पोलीसही चक्रावून गेले आहेत. यातच आता आफताबने (aftab poonawalla news) विकत घेतलेल्या दोन हातोड्यांचे काय केले, त्यानेच तर श्रद्धाच्या डोक्याचे तुकडे केले गेले का? यासंदर्भात दिल्ली पोलीस आता शोध घेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफताब पूनवालाने (aftab poonawalla) श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच हे तुकडे एक एक करत दिल्लीतील मेहरोली परिसरात असलेल्या जंगलात फेकण्यात आले होते. या हत्याकांड प्रकरणानंतर आफताबला दिल्ली पोलिसांनी (delhi Police) अटक केली आहे. आफताबला अटक करून 23 दिवस झाले असली तरी अद्याप दिल्ली पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागले नाहीत.


तसेच आरोपी आफताबची पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी (Polygraph and Narco Test) पूर्ण झाली आहे. याचदरम्यान आफताबने विकत घेतलेल्या दोन हातोड्यांनी श्रद्धाच्या डोक्याचे तुकडे केले आणि नंतर लहान करवतीने मृतदेहाचे तुकडे केले का, या अँगलने आता पोलीस पुढे तपास करत असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे पोलिसांना अद्यापही श्रद्धाचे शीर सापडलेले नाही.   


 वाचा: भाईंदरच्या खाडीत दिल्ली पोलिसांचं सर्च ऑपरेशन, पुराव्यांचा कसून शोध 


श्रद्धा आणि आफताबच्या सोशल मीडियाचाही तपास


आफताब आपल्या इस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया (Social media) अकाऊंट्सच्या माध्यमातून बड्या रेस्टॉरंट्स आणि खाण्याच्या दुकानांची जाहिरात करायचा. यासाठी तो 15 ते 25 हजार रुपयांपर्यंत पैसेही आकारत होता. त्याचे 8 ते 10 क्लाएंटही असल्याचं तपासात उघड झालं आहे. तसेच आफताब आणि श्रद्धा (Aftab and Shraddha) यांच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंट्सचीही छाननी केली जात आहे.


आफताबची न्यायालयीन कोठडी दोन दिवसांनी पूर्ण होत आहे. 08 डिसेंबर रोजी पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आफताबला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. यासोबतच या प्रकरणाशी संबंधित अपडेटही न्यायालयासमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, आफताबची इंटरनेट सर्च हिस्ट्री तपासल्यावर असे आढळून आले आहे की, श्रद्धाच्या हत्येनंतर जून महिन्यात लढलेली जगातील सर्वात महागडी केस आफताबने अनेकवेळा पाहिली आणि वाचली होती. या प्रकरणातून कायद्याच्या सर्व युक्त्या मी समजावून घेतल्या होत्या, असे सांगितले जात आहे.