Shraddha Murder Case : श्रद्धा हत्या प्रकरण दररोज नवे नवे खुलासे होत आहेत. दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) हत्या प्रकरणातले पुरावे शोधले जात आहेत. याचसंदर्भात दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांचं एक पथक मुंबईत आलं आहे. आज या पथकाने भाईंदरच्या खाडीत (Bhayander Bay) सर्च ऑपरेशन (Search Operation) राबवलं. श्रद्धा हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून पुरावे गोळा केले जात आहेत. आफताबने 18 मेला श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर घटनेच्या तीन आठवड्यंनी आफताब वसईतील (Vasai) त्याच्या घरी आला होता. वसईतल्या घरातलं बरचसं सामाने त्याने दिल्लीला शिफ्ट केलं होतं, अशी माहिती आहे.
नायगाव आणि वसईत भाड्याने राहिले
आफताब आणि श्रद्धा यांनी दिल्लीत भाड्याने घर घेतलं होतं, 2019 पासून ते दिल्लीत रहात होते. त्याआधी त्यांनी नायगाव आणि वसईत भाड्याने घर घेतलं होतं. वसई पूर्वेत आफताबचं कुटुंब (Aaftab Poonawala Family) गेल्या दोन दशकापासून रहात होते. आफताबला अटक होण्यापूर्वी म्हणजे 12 नोव्हेंबरला पुनावाला कुटुंब दुसरीकडे राहला गेलं.
पोलिसांची सर्वात मोठी शोधमोहिम
श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आता सर्वात मोठी शोधमोहीम सुरु केलीय. श्रद्धाच्या हत्येच्या तपासात पुढचे 100 तास महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच दिल्ली पोलिसांची 200 जणांची सर्वात मोठी टीम तयार करण्यात आलीय. श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करुन ते जंगलात आणि तलावात फेकण्यात आले होते. त्यामुळे हे तुकडे शोधण्याचं सर्वात मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. आतापर्यंत श्रद्धाचा जबडा तसंच 18 हाडं सापडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. हे अवशेष तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. आफताबच्या मोबाईलच्या लोकेशनच्या आधारावर पोलिसांनी एक नकाशा तयार केलाय. तो जिथे जिथे गेलाय त्या घटनास्थळावर पोलीस शोध घेणार आहेत.
आफताबची पॉलीग्राफ टेस्ट
श्रद्धाची हत्या करणारा आरोपी आफताबची पॉलीग्राफ टेस्ट (Polygraph Test) सुरु झालीय. दिल्लीच्या रोहिणी फॉरेन्सिक लॅबमध्ये (Forensic Lab) ही टेस्ट होतेय. काल आफताबला ताप आल्यानं त्याची टेस्ट झाली नव्हती. त्यामुळे आजच्या पॉलीग्राफ टेस्टमधून श्रद्धा हत्येसंदर्भात काय उलगडा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. श्रद्धा हत्याकांडात आतापर्यंत 17 जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. त्याचसोबत डेटिंग अॅपवरुन मैत्री झालेल्या आफताबच्या दोन मैत्रिणींचाही जबाब नोंदवण्यात आलाय.
हे ही वाचा : Jama Masjid चं महिलांविरोधात तुघलकी फर्मान, एकट्या महिलेला प्रवेश बंदी
आफताब 4 मोबाईल नंबर वापरत होता
आफताब पुनावाला हा 4 मोबाईल नंबर वापरत होता अशी धक्कादायक माहिती आता समोर येतेय. 4 वेगवेगळे नंबर आफताबकडे आढळून आले आहेत. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवले. फ्रिज मागवण्यासाठी जो नंबर आफताबने वापरला तो श्रद्धाच्या नावावर असल्याची माहितीही समोर येतेय. विशेष म्हणजे फेसबुकचं लॉग इन करण्यासाठी श्रद्धा हाच मोबाईल वापरत होती. श्रद्धाच्या फेसबुक अकाऊंट आणखी एका नंबरसोबतसुद्धा लिंक होतं. आफताबच्या फेसबुक अकाऊंटचा जेव्हा तपास करण्यात आला तेव्हा ही सर्व माहिती समोर आलीय. त्याच्या फेसबुक आयडीसोबतही दोन नंबर लिंक होते. त्यामुळे आफताब दोन मोबाईल नंबरवरुन फेसबुक अकाऊंट वापरत असल्याचं दिसून येतंय.