Shraddha Walker News: गेल्या महिन्यात श्रद्धा वालकर हत्याकांडाने (Shraddha Walker murder case) अख्ख्या देशाला हादरवलं होतं. प्रेमाचे 35 तुकडे करणाऱ्या अफताबला (Aaftab Poonawala) अटक करण्यात आली होती. श्रद्धा हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांना मेहरौलीच्या जंगलातून केस आणि हाडे सापडली होती. हे हाडे आणि केस श्रद्धाचे आहेत हे तपासण्यासाठी नमूने हैदराबाद लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर आता या प्रकरणात ६ हजार पानांचं चार्जशीट (charge sheet) दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात सर्वात मोठी खुलासा झालाय. (shraddha walker case updates police files 6629 page charge sheet against aftab poonawalla latest marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी या प्रकरणात 4 राज्यांमध्ये 9 पथकं पाठवून तपास केला तसंच 150 जणांची साक्ष नोंदवली आहे. 75 दिवसांच्या अवधीत पोलिसांनी काम पूर्ण केलं. दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या चार राज्यात एसआयटीने (SIT) तपास केला होता. त्यानंतर आता चार्टशीटमधून मोठा श्रद्धाच्या हत्येचं कारण समोर आलंय.


अफताबने श्रद्धाला का संपवलं?


चार्जशीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि अफताबमध्ये भांडण झाल्यानंतर आफताबने श्रद्धाची हत्या केली. श्रद्धा तिच्या दुसऱ्या मित्राच्या घरी राहिली होती म्हणून आफताब तिच्यावर नाराज झाला होता. याच गोष्टीवरून दोघांमध्ये वाजलं. भांडण टोकाला गेलं आणि आफताबने तिचं तोंड दाबलं आणि गळा आवळून खेळ खल्लास केला. 18 मे 2022 च्या दुपारी ही घटना घडल्याची माहिती चार्जशीटमधून (Police files charge sheet) समोर आली आहे.


आणखी वाचा - Shraddha Murder Case: 37 वस्तू आणि तिचे 35 तुकडे... क्रूरकर्मा अफताबचा हैवानी प्लान


दरम्यान, आफताबने श्रद्दाला विचारलं, कुठे गेली होती आणि कोणाला भेटायला गेली होती. मैत्रिणीला भेटायला गेल्याचं श्रद्धाने आफताबला सांगितलं. मात्र, संशयी आफताबला राग आला त्यानंतर भांडण सुरू झालं. पोलीस तपासात आफताबने हत्या केल्याची कबुली देखील दिली आहे. त्यामुळे आता कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय.