Shraddha Murder Case: 37 वस्तू आणि तिचे 35 तुकडे... क्रूरकर्मा अफताबचा हैवानी प्लान

Aaftab Poonawala Narco Test: मंगळवारी आफताबच्या कोठडीची मुदत संपत असल्याने आजच आफताबची नार्को टेस्ट (Narco Test) केली जाण्याची शक्यता आहे.  पूनावालाच्या ‘नार्को’ चाचणीची परवानगी मिळाली आहे.   

Updated: Nov 21, 2022, 10:52 AM IST
Shraddha Murder Case: 37 वस्तू आणि तिचे 35 तुकडे... क्रूरकर्मा अफताबचा हैवानी प्लान   title=
shraddha walker murder case delhi police aftab poonawala packers

Shraddha Murder Case: आफताब पूनावाला (Aaftab Poonawala) या प्रियकराने श्रद्धा वालकर या (Shraddha Walker) प्रेयसीचा खून करून तिचे 35 तुकडे केले आहेत. घटनेच्या 18 दिवसांनंतर नवी दिल्लीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आता दिवसेंदिवसे दिल्ली पोलिसांकडून मोठे खुलासे करण्यात येत आहे. देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा प्रकरणानंतर तिचे कवटीचे आणि हाडांचे काही अवशेष दिल्ली पोलिसांना रविवारी जंगल परिसरात सापडले. तसेच आफताब पूनावाला याने श्रद्धाच्या हत्येनंतर (Shraddha Murder Case) त्यांच्या वसईतील घराचे सामान वसईवरून दिल्लीला मागवले होते. अशी माहितीसमोर आली आहे.   

आफताबने 18 मे ला त्याची प्रेयसी श्रद्धाची गळा दाबून हत्या केली होती. श्रद्धा आणि आफताब लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होते आणि दिल्लीत राहत होते. मुंबईतील (Mumbai Crime News) एका कार्यक्रमात आफताब आणि श्रद्धा एकमेकांच्या प्रेमात पडले. घरच्यांचा विरोध पाहून या दोघांनी दिल्लीला जाऊन एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. यांनतर श्रद्धाने लग्नाची इच्छा व्यक्त केली असता आफताबने तिचा खून केला. 

दरम्यान आरोपी आफताब पूनावाला (Aaftab Poonawala) याने श्रद्धाची सहा महिन्यांपूर्वी हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे तलावातही फेकले असावेत, असा पोलिसांकडून खुलासा करण्यात आला. तसेच दिल्ली-राष्ट्रीय राजधानी परिसरातील मेहरौली आणि गुडगावच्या जंगल भागात शोध घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी पोलिसांनी श्रद्धाच्या कवटीचे आणि शरीराच्या इतर भागांचे काही अवशेष आणि बहुतेक सर्व हाडे जप्त केली. श्रद्धा हत्याप्रकरणानंतर दिल्ली पोलीस आफताबची आज (21 नोव्हेंबर) नार्को चाचणी घेणार आहेत. 

 मुंबईतून 37 वस्तू दिल्लीत मागवल्या 

आता दिल्ली (delhi crime) पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने मुंबईतील वसई येथून एकूण 37 वस्तू दिल्लीत मागवल्या होत्या. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी गुडलक पॅकर्स आणि मूव्हर्सशी संबंधित गोविंद यादव यांना बोलावून चौकशी केली. दिल्ली पोलिसांच्या पथकाने नयानगर पोलिस ठाण्यात गोविंद यादवची चौकशी केली. 18 मे रोजी श्रद्धाच्या हत्येनंतर सुमारे 18 दिवसांनी 5 जून रोजी आफताबने मुंबईहून दिल्लीला काही सामान मागवले होते, असे सांगितले जाते. त्याची पावतीही दिल्ली पोलिसांना मिळाली आहे. दिल्ली पोलिसांना मिळालेली पावती 5 जूनची आहे. त्यात एकूण 37 वस्तूंची नावे आहेत. जी मुंबईतील वसईहून दिल्लीत आणून आफताबला देण्यात आली होती. पावतीवरही आफताबचे नाव आहे. या वस्तू आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर मागवल्याचे पावतीवरून स्पष्ट झाले आहे.

वाचा : भाऊसुद्धा उलट्या काळजाचा, 2019 साली तिच्या आईला... श्रद्धा हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर!

दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर बाहेर आलेल्या गोविंद यादवने या वस्तू मिळवण्यासाठी आफताबने ऑनलाइन बुकिंग केल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, आफताबने बुकिंग केले तेव्हा आम्ही गावी गेलो होतो. आफताबचे सामान इतर कर्मचाऱ्यांनी मुंबईहून दिल्लीला मागवल्याचे गोविंद यांनी सांगितले. आफताबच्या बुकिंगशी संबंधित सर्व कागदपत्रे आम्ही दिल्ली पोलिसांना सोपवली आहेत, असेही त्यांनी सांगितले. गोविंदच्या म्हणण्यानुसार, आफताबने ज्या वस्तू मुंबईहून दिल्लीला मागवल्या होत्या त्या सर्व घरगुती वस्तू होत्या. सामान दिल्लीला शिफ्ट करण्यासाठी 20 हजार रुपये आफताबने गूगल-पेद्वारे भरले होते. एक आठवडयात आम्ही सामान दिल्लीच्या पत्त्यावर पोहोचवले, असे यादव याने पोलिसांना सांगितले.