नवी दिल्ली : २०२० सालची अमरनाथ यात्रा रद्द होणार नाही. सरकारने अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय बदलला आहे. यावर्षी २३ जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरूवात होणार आहे. याआधी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे श्री अमरनाथ जी श्राईन बोर्डाचे अध्यक्ष आणि उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्मु यांनी ३८व्या बोर्ड मीटिंगचं नेतृत्व केलं. जम्मूच्या राजभवनात झालेल्या बैठकीत यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीरमध्ये ७७ रेड झोन असल्यामुळे अमरनाथ यात्रा रद्द केली पाहिजे, असा सूर या बैठकीत उमटला. अमरनाथ यात्रेचे भाविक याच मार्गाने जातात. भाविकांसाठी कॅम्प लावणं, वैद्यकीय सेवा पुरवणं, लंगर आणि बर्फ हटवण्याचं काम शक्य नाही, असं सांगण्यात आलं. 


भारत सरकारने लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवला आहे. ३ मेच्या पुढची स्थिती अजूनही स्पष्ट नाही, त्यामुळे आम्हाला आता यात्रेला परवानगी देता येणार नाही. आमच्यासाठी भाविकांची सुरक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, असं उपराज्यपाल म्हणाले होते.