Sidhu Moose Wala Murder Case: सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांना (Delhi Police) मोठं यश मिळालं आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Special Cell) सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, सिद्धू मूसवाला हत्याकांडात सहभागी असलेल्या दोन मुख्य शुटर्ससह तिघांना अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. स्पेशल सेलचे स्पेशल सीपी एचजीएस धालीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवाला यांची 29 मे रोजी हत्या करण्यात आली होती. त्यावर विशेष सेल सातत्याने काम करत होता.


सिद्धु मुसेवाला हत्याप्रकरणात एकूण सहा शूटर्सची ओळख पटली आहे. त्या दिवशी दोन मुख्य सूत्रधार संपूर्ण घटना घडवून आणत होते. 
दोनही सूत्रधाकर गोल्डी ब्रारच्या संपर्कात होते. त्यापैकी एक सूत्रधार असलेला कशिश हा बोलेरो गाडी चालवत होता, बोलेरो गाडीत 4 शुटर्स आणि कोरोलामध्ये 2 शूटर होते. जगरूप रूपा हा कोरोला कार चालवत होता, ज्यामध्ये मनप्रीत मनू देखील होता. सिद्धू मुसेवालावर पहिला गोळीबार मनप्रीत मनूने केला. नंतर इतर सर्वांनीही गोळीबार केला. घटनेनंतर मनप्रीत मनू आणि रूपा लगेच निघून गेले. 


गुजरातमधून आरोपींना अटक
याप्रकरणी स्पेशल सेलने गुजरातमधील मुद्रा पोर्टजवळून आरोपींना अटक केली. आरोपींनी याठिकाणी भाड्याने घर घेतलं होतं. त्यांच्याकडून 8 ग्रेनेड, ग्रेनेड लाँचर, 9 इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरही जप्त केले आहेत. तर हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.


अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी एक आरोपी घटनेच्या वेळी मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रारच्या संपर्कात होता. सिद्धू मुसेवाला पुरेशा सुरक्षेशिवाय फिरत असल्याची माहिती गोल्डी ब्रारला देण्यात आली. गोळीबार केल्यानंतर पुन्हा गोल्डीला फोन केला आणि काम फत्ते झाल्याचं सांगण्यात आलं. हल्ल्यात एके सिरीजच्या रायफलचा वापर करण्यात आला. हत्येच्या वेळी त्यांच्यासोबत ग्रेनेडही होते. जो त्याने बॅकअपसाठी ठेवला होता. रायफलचा वापर करता आला नाही तर हँडग्रेनेड फेकण्याचा त्यांचा प्लान होता. 


गोळीबारात सिद्धू मुसेवाला यांची हत्या
पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसवाला (Sidhu Moose Wala) यांची 29 मे रोजी संध्याकाळी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीने स्वीकारली होती. बिश्नोई एका प्रकरणात दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील कॅनेडियन वंशाचा सदस्य असलेल्या गोल्डी ब्रारने (Goldy Brar)फेसबुक पोस्टमध्ये मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे