Sidhu Moosewala Net Worth : दिवंगत पंजाबी गायक आणि रॅपर शुभदीप सिंग सिद्धू अर्थात सिधू मुसेवाला  (Sidhu Moosewala)  याच्या आईने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.  सिद्धू मूसेवालाच्या आई चरणनं वयाच्या 58 व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या आईने IVF द्वारे दिला मुलाला जन्म दिला.  जन्मल्या-जन्मल्याच  सिद्धू मुसेवालाचा भाऊ बनला कोट्याधीश बनला आहे. सिद्धू मूसेवाला याची सर्व संपत्ती या  बाळालाच मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धू मूसेवाला याचा जन्म 11 जून 1993 मध्ये झाला. तर, 29 मे  2022 मध्ये गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येने पंजाबमध्ये खळबळ उडाली होती. सिद्धू हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. 
सिद्धू मूसेवाला याच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरात आणखी मसेवालचा जन्म झाला आहे. त्याच्या आई-वडिलांनी गेल्या महिन्यात आई-वडील होणार असल्याची गोड बातमी त्याच्या चाहत्यांना दिली होती.  सिद्धू मुसेवाला यांच्या आईने IVF द्वारे दिला मुलाला जन्म दिला. यानंतर  सिद्धू मूसेवालाचे वडील बलकौर सिंग यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बाळाचा फोटो शेअर केला तसेच. बाळाचे नाव काय ठेवले हे देखील सांगितले. सिद्धू मुसेवाला याच्या लहान भावाचे नाव शुभदिप असे ठेवण्यात आले आहे. 


सिद्धू मूसेवालाची सर्व संपत्ती बाळाला मिळणार


सिद्धू मूसवाला खूपच लक्झरी लाइफ जगत होता. कोट्यावधीच्या संपत्तीचा तो मालक होता.  सिद्धू मुसेवाला प्रसिद्ध सिंगर आणि रॅपर होता. देशभरात त्याचे म्युजीक कॉन्सर्ट व्हायचे. कमी वयात त्याने कोट्यावधीची संपत्ती कमावली होती. 2022 साली सिद्धू मुसेवाला याने काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर मानसामधून निवडणूकही लढवली होती.  यावेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात संपत्तीचा आकडा जाहीर केला होता. या प्रतिज्ञापत्रानुसार सिद्धू मूसवाला याची नेटवर्थ 7, 87, 21, 381 रुपये इतकी होती. सिद्धू 30 कोटींच्या संपत्तीचा मालक होता. म्युजीक कॉन्सर्ट आणि YouTube हे त्याच्या कमाईचे माध्यम होते. यासह कोट्यावधीची शेत जमीन अलिशान कार देखील त्याच्याकडे होत्या.