Silent Heart Attack मुळे तरुणाचा मृत्यू! बाईक चालवताना अचानक भररस्त्यात पडला अन्..
Man Died By Silent Heart Attack Know Symptoms: ही व्यक्ती त्याच्या दुचाकीवरुन जात असताना अचानक तोल जावून भररस्त्यात पडली. या व्यक्तीची शुद्ध हरपल्यानंतर स्थानिकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं.
Man Died By Silent Heart Attack Know Symptoms: मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. येथील एका 35 वर्षीय व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुचाकीवरुन प्रवास करत असताना अचानक ही व्यक्ती दुचाकीसहीत भरस्त्यात कोसळली. या व्यक्तीला अचानक काय झालं हे कोणाला कळालच नाही. नंतर या व्यक्तीचा मृत्यू सायलेंट हार्ट अटॅकने झाल्याचं स्पष्ट झालं.
बाईक चालवताना पडला
ही 35 वर्षीय व्यक्ती बाईक चालवताना अचानक रस्त्यावर पडली. या व्यक्तीची शुद्ध हरपली. बाणगंगा रोडवर हा सारा प्रकार घडल्यानंतर स्थानिकांनी रुण्गवाहिका बोलवून या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच या व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यास नकार दिला आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव तिर्थराम सोनावणे असं आहे. ते 35 वर्षांचे होते. गोविंदनगरमध्ये राहणाऱ्या बिहारी लाल सोनावणे यांचे ते पुत्र होते.
घरच्यांना फोन आला
मंगळवारी सकाळी काही कामानिमित्त तिर्थराम आपली बाईक घेऊन घराबाहेर पडले. काही वेळातच त्यांच्या कुटुंबाला फोन आला आणि तिर्थराम रस्त्यात बेशुद्धावस्थेत सापडल्याचं समोरच्या व्यक्तीने कळवलं. कुंटुंबातील सदस्य घटनास्थली पोहोचले असता स्थानिकांनी तोपर्यंत रुग्णवाहिकी बोलावली होती. तिर्थराम यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिर्थराम यांना ब्रॉट डेड म्हणजेच रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत झाल्याचं सांगितलं.
मृत्यूचं कारण सायलेंट हार्ट अटॅक
सायलेंट हार्ट अटॅकनेमुळे तिर्थरामचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सायलेंट हार्ट अटॅकला वैद्यकीय भाषेत सायलेंट मायक्रोकार्डिअल इन्फ्रॅक्शन म्हणजेच एसएमआय असं म्हटलं जातं. सायलेंट हार्ट अटॅकमध्ये व्यक्तीला छातीमध्ये कळ आल्याचं जाणवत नाही. थेट हृदयविकाराचा धक्काच बसतो. मात्र छातीत कळ येण्याचं लक्षण वगळता इतर लक्षण मात्र दिसतात. सायलेंट हार्ट अटॅकची सामान्य हार्ट अटॅकप्रमाणे कोणतीही विशेष लक्षणं दिसत नाहीत. मात्र सायलेंट हार्ट अटॅकची साधारणपणे वेगळी लक्षणं खालीलप्रमाणे...
सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणं..
ताप येणे/ अंग तापणे
छातीजवळ सूज येणे किंवा पाठीच्या वरच्या भागात खांद्याजवळ सूज येणे
अनुवटीजवळ वेदना जाणवणे, हात किंवा पाठीच्या वरच्या भागातील स्नायू दुखणे
दमल्यासारखं वाटणे
सामान्यपणे येणाऱ्या हार्ट अटॅकची लक्षणं काय आहेत?
छातीत दुखणे
छातीलील दुखणं काही मिनिटांपेक्षा अधिक काळ राहणे
श्वास घेण्यास त्रास होणे
अस्वस्थ वाटू लागणे
डोकं हलकं वाटणे
अचानक घाम येणे
उलट्या होणे
उगाच थकल्यासारखं वाटणे आणि हा थकवा काही दिवस राहणे