ढोल ताशा बंद करुन हेडफोन लावून नाचले वऱ्हाडी! पण का? कारण ऐकून कराल कौतुक
silent Varat: तुम्ही सायलेंट वरातीबद्दल ऐकला आहात का? ही वरात रस्त्याने जात असली तरी अनेकांना कळतही नाही. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Silent wedding Varat: सध्या लग्न सराईचे दिवस आहेत. लग्न झाल्यावर डिजे, ढोल ताशाच्या आवाजात वरात काढण्याची आपल्याकडे पद्धत असते. यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. तसेच त्याच्या आवाजाने अनेकदा पोलिसांकडे तक्रारही केली जाते. पण तुम्ही सायलेंट वरातीबद्दल ऐकला आहात का? ही वरात रस्त्याने जात असली तरी अनेकांना कळतही नाही. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. अशी वरात काढण्यामागे खास कारण होतं. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
वरातीत डिजेचा आवाज ऐकून कोणीही स्वत:ला डान्स करण्यापासून आवरु शकत नाही. पण कोणत्या लग्नात ढोल-ताशेच नसले तर? असाच एक व्हिडीओ सोशल मीडियात सध्या चर्चेचा विषय बनलाय. ज्यामध्ये सायलेंट वरात रस्त्यावरुन जातेय. ही वरात शांत असण्यामागच खास कारण जाणून घेण्यासारख आहे. हे कारण समजल्यावर तुम्हीदेखील वऱ्हाडाच कौतुक कराल.
@shefooodie या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये ढोल ताशांविना वऱ्हाडी डान्स करताना दिसतायत. लोकांनी कानात हेडफोन घातलाय आणि जोशात डान्स करतायत. तुम्ही ए दिल हे मुश्किल सिनेमा पाहिला असेल तर हा कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात येईल. प्रत्येकजण हेडफोनवर एक गाणं ऐकतो. यामुळे आजुबाजूला गोंधळ होत नाही.
सायलेंट वरात
नवऱ्या मुलापासून सर्व वऱ्हाडाने कानात हेडफोन घातलाय. यातून गाणे ऐकून ते डान्स करत आहेत. त्यांना ढोल ताशांवर नाचण्यासही काही अडचण नव्हती पण त्यांनी तसे केले नाही. यामागचे कारण समोर आले आहे. वरात जात असलेल्या ठिकाणी एक कॅन्सर रुग्णालय आहे. कॅन्सर रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी सायलेंट वरातीचा निर्णय घेतला. अकाऊंटवर वरातीचे दोन व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये एकाच्या बॅकग्राऊंडला गाणे ऐकू येत आहे तर दुसऱ्या व्हिडीओत ओरिजनल गाणे ऐकू येतंय
व्हिडीओ होतोय व्हायरल
या दोन्ही व्हिडीओला सोशल मीडियात खूप पसंती मिळत आहे. याला आतापर्यंत 1.9 कोटी व्ह्यूज मिळाले आगेत तर दुसरा व्हिडीओला 25 हजारहून अधिक जणांनी पाहिलाय. कोणी म्हणतंय यामुळे ध्वनी प्रदूषण होत नाहीय. हे चांगल पाऊल आहे. तर सारे हेडफोन एकाचवेळी कसे कनेक्ट झाले? असा प्रश्न दुसऱ्याने विचारला आहे. तर सायलेंट वरात हे एक चांगले पाऊल आहे, यामुळे कोणाला त्रास होणार नाही, अशी कमेंटही तिसऱ्या युजरने केली आहे.