How to Change Boarding Station: तिकीट बुक केल्यानंतरही बोर्डिंग स्टेशन बदलात येतं? जाणून घ्या कसं...
जर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक केलं असेल तर `या` पद्धतीने बदलू शकता बोर्डिंग स्टेशन...
मुंबई : IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) या वेबसाईटद्वारे रेल्वे प्रवासासाठी तिकीट बुकिंग करता येते. पण कित्येकदा तरी असं होतं की, आपल्याला आहोत त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बोर्डिंग स्टेशन बदलण्याची वेळ येते पण वेगळं बोर्डिंग स्टेशन असल्यामुळे 'हा' पर्यांय अडचणीचा ठरतो. IRCTC च्या नियमानुसार, प्रवासी त्यांचा प्रवास सुरु करण्याआधी म्हणजेच 24 तास आधी बोर्डिंग स्टेशन बदलता येतं.
जर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुकिंग केलं असेल तर 'या' पद्धतीने बदला बोर्डिंग स्टेशन...
- सर्वात प्रथम IRCTC च्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन लॉगिन आयडी आणि पासवर्ड भरा.
- यानंतर My Transactions सेक्शनमध्ये जाऊन, Booking Ticket History या ऑप्शनची निवड करा.
- नंतर Booked Train Tickets हे पेज ओपन होईल.
- ज्या ट्रेनचं बोर्डिंग स्टेशन बदलायचं आहे त्या ट्रेनची निवड करा.
- योग्य ट्रेनची निवड केलीये की नाही याची खात्री केल्यानंतर Change Boarding Point हा ऑप्शन निवडा.
- यानंतर पॉप-अप विंडो ओपन होईल, शेड्यूलसाठी सर्व ट्रेन्सची यादी स्क्रीनवर दिसेल.
- ड्रॉप डाउन मेन्यूमध्ये change boarding Station सेक्शनमध्ये जाऊन नवीन बोर्डिंग स्टेशनची निवड करा.
- असं केल्यामुळे तुमच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल.
'या' गोष्टींची घ्या काळजी
- बोर्डिंग स्टेशन बदलण्यासाठी तुमच्याकडे ऑनलाइन तिकीट असणं आवश्यक आहे.
- ट्रेन सुटण्याच्या 24 तासांपूर्वीच ही प्रक्रिया करावी लागते.
- हा बदल एकदाच करता येतो.
- ट्रॅव्हल एजंटकडून तिकीट बुक केल्यास ही सुविधा मिळणार नाही.
- PNR आणि VIKALP पर्यायासाठी बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा नाही.