गिझर, हिटर वापरुनही कमी येईल `लाईट बिल`; फक्त करा ही 2 कामं...
बिलाचे आकडे काहींना थंडीतही घाम फोडतात...
नवी दिल्ली : हिवाळ्यामध्ये एकिकडे मन थंडगार वाऱ्यावर झुलत असतो, तर दुसरीकडे काही मंडळींना मात्र वेगळ्याच कारणानं घाम फुटलेला असतो. हे कारण म्हणजे थंडीत येणारं लाईट बिल.
सहाजिकच आहे या दिवसांमध्ये हिटर आणि गिझरचा वापर वाजपीपेक्षा वाढलेला असतो. परिणामी यानंतर येणारे बिलाचे आडके चक्रावणारे असतात.
पण, मुळात तुम्हाला माहितीये का इथंही नियोजन आणि समयसूचकता तुम्हाला तारु शकते. अर्थात खिशातील पैसे खिशातच राहण्यास मदत करु शकते. कशी ती पाहुया...
5 स्टार रेटिंग असणारी उपकरणं
कोणतंही विद्युत उपकरण खरेदी करताना सर्वप्रथन त्याची स्टार रेटिंग तपासून पाहा. सहसा 5 स्टार रेटिंग असणारी उपकरणं ही कमी वीजेतही चालतात.
सध्या बाजारात अशी अनेक उपकरणं आहेत. ज्यामध्ये फ्रिज, टीव्ही, एसी, हिटर यांचा समावेश आहे. यामुळं तुमचे हजारो रुपये वाचतील.
जास्त क्षमतेचा गिझर निवडा
गिझरसलाठी जास्त वीजेचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही जास्त क्षमतेचा गिझर वापरु शकता. ज्यामध्ये एकदा गमर केलेलं पाणी चार तासांपर्यंत गरम राहतं.
अर्थात तुम्हाला प्रत्येक वेळी गिझर सुरु करण्याची गरज नाही. एकदाच पाणी गरम केलं, की प्रश्न सुटला.
सतत वापर नकोच...
हिटर, गिझर सतत चालू ठेवू नका. ही उपकरणं काही सेकंदांत गरम होतात. त्यामुळं समजुतदारपणे ती वेळेतच बंद करा.
सतत गिझर, हिटर सुरु ठेवल्यामुळं जास्त वीज वापरली जाते आणि य़ामुळे वीजबिल वाढतच राहतं.
वॉशिंग मशिनही सतत लावण्यापेक्षा आठवड्यातून तीन किंवा दोन दिवसांचे कपडे त्यामध्ये वापरल्यासही वीज काही प्रमाणात वाचवता येते.