मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. रोज कोरोनाचे अनेक रुग्ण समोर येत आहेत. या आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रत्येक जण सांगितलेल्या सल्ल्यांचा वापर करत आहे. कोरोनाचा संसर्ग झाला नसेल तरी देखील तुम्ही कोरोनाची चाचणी करू शकता. स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तरी सर्व प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कशी कराल चाचणी 
कोरोना व्हायरसच्या चाचणी करण्यासाठी देशात ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आली आहे. प्रमुख डिजिटल हेल्थकेअर स्टार्ट-अप Practo अनुसार  तुम्ही कोरोना व्हायरसची चाचणी करू शकता. आमची सहयोगी वेबसाईट झी बिझनेसने  प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बेंगळुरू येथील एका कंपनीने सांगितले की,  कंपनीने थायरोकेयरबरोबर भागीदारी करुन तपासणी चाचणी करून घेतली आहे, ज्याला भारत सरकार आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून मान्यता मिळाली आहे. 


मुंबईत सेवा सुरू, लवकरच ही सेवा संपूर्ण भारतात सुरू करण्यात येणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार Practoने ही सेवा सध्या मुंबईत ऑनलाईन सुरू केली आहे. लवकरच ही सेवा भारतात देखील सुरू करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ही चाचणी करण्यासाठी डॉक्टरांकडून मिळेलं प्रेसक्रिप्शन गरजेचं असणार आहे. पण ही चाचणी करण्यापूर्वी विनंती अर्ज भरावा लागणार आहे. 


शिवाय त्या आर्जावर डॉक्टरांची सही असणं तितकचं  महत्त्वाचं असून फोटो आणि ओळख पत्राची देखील गरज भासणार आहे. Practoच्या म्हणण्यानुसार या चाचणीसाठी ४,५०० रूपये किंवा त्यापेक्षा जास्त पैसे लागू शकतात. शिवाय तुमच्या रक्ताच्या नुमन्यासाठी Practoचा अधिकारी तुमच्या घरी येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.