देशात कोरोनाचा उद्रेक; गेल्या २४ तासात ६०,९६३ रुग्णांची नोंद
देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २३ लाखांच्या वर पोहोचली आहे.
मुंबई : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण देशात चिंताग्रस्त वातावरण पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीपासून कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या २४ देशात ६० हजार ९६३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. शिवाय ८३४ रुग्णांनी या धोकादायक विषाणूमुळे आपले जीव गमावले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाच्या विळख्यातून बाहर येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.
देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २३ लाख २९ हजार ६३९ इतकी झाली आहे. त्यापैकी ६ लाख ४३ हजार ९४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १६ लाख ३९ हजार ६०० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४६ हजार ९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
त्याप्रमाणे आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार देशात ऍक्टीव्ह कोरोना २८.२१ टक्के आहे. तर या धोकादायक विषाणूच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६९.८० टक्के असून मृत्यू झालेल्यांचे प्रमाण १.९९ टक्के आहे.