मुंबई : देशात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्येत सतत वाढ होताना दिसत. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांमध्ये भारतात ६४ हजार ३९९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८६१ रुग्णांचा कोरोना या धोकादायक विषणूने बळी घेतला आहे. भारतात ऑगस्ट महिन्यात जगातील सर्वाधिक कोविड-१९ चे हॉटस्पॉट समोर येत आहेत. भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सर्वाधिक रूग्ण आढळल्याचे समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या २१ लाख ५३ हजार ११  वर पोहोचली आहे. त्यापैकी ६ लाख २८ हजार ७४७ रुग्णांवर उपचार सुरू  आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १४ लाख ४० हजार ८८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४३ हजार ३७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 



दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. २,३,५ आणि ६ ऑगस्टच्या दिवशी भारतात सर्वाधिक रुग्ण सापडल्याची माहिती मिळत आहे. 


देशात अशी ६ राज्ये आहेत जिथे कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या एक लाखाहून अधिक झाली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जवळपास १ लाखाच्या वर गेली आहे.