Crorepati Calculator: आयुष्यात करोडपती व्हावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न कधी प्रत्यक्षात उतरेल यावर अनेकांचा विश्वास नसतो. कारण नोकरदार वर्गातील बहुतांश जणांना 20 हजारच्या आतच पगार असतो. अशावेळी खर्च काय करायचा आणि सेव्हिंग काय करायची? असा प्रश्न पडतो. पण तुमची इच्छा असेल तर अशक्य असे काही नाही. छोट्या छोट्या गुंतवणुकीतून तुम्ही मोठी रक्कम उभी करु शकता.  तुमचा पगार 20 हजार असेल तरी तुम्ही करोडपती देखील होऊ शकता. यासाठी फॉर्मुला जाणून घेऊया. 


बचत आणि गुंतवणुकीसाठी सूत्र 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

\महिन्याला 20 हजार पगार असेल तर घर कसं चालवायचं इथून सुरुवात होते. पण तरीही तुम्ही करोडपती बनण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते प्रत्यक्षातही उतरु शकते. उत्पन्न कितीही कमी असले तरी बचत करून तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल. बचत आणि गुंतवणुकीसाठी तुम्हाला 70:15:15 चा फॉर्मुला वापरावा लागेल. 


सूत्राचा अर्थ समजून घ्या


70:15:15 फॉर्मुला म्हणजे काय हे समजून घेऊया. तुम्हाला 20 हजार इतका पगार असेल तर त्याचे 70 टक्के तुम्ही घरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरा. 15 टक्के रक्कम आपत्कालीन निधी म्हणून तयार ठेवा. तर 15 टक्के रक्कमेची गुंतवणूक करा. 20,000 रुपयांचे 70 टक्के रुपये 14 हजार होतात.  याचा अर्थ तुम्हाला तुमचे सर्व खर्च 14,000 रुपयांमध्ये भागवावे लागतील. आपत्कालीन निधी आणि गुंतवणुकीसाठी तुम्हाला 15-15 टक्के म्हणजेच प्रत्येकी 3 हजार रुपये ठेवावे लागतील.


हेही वाचा: तिशीत गुंतवणूक सुरु करा 45 व्या वर्षी व्हाल करोडपती, 15 वर्षात श्रीमंत होण्याचा फॉर्मुला 


करोडपती होण्यासाठी गुंतवणूक 


दरमहिन्याला 3 हजार गुंतवणूक करुन कोण करोडपती होईल का? असे असेल तर यासाठी कुठे गुंतवणूक करावी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचे उत्तर जाणून घेऊया. तुम्हाला म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करावी लागेल. म्युच्युअल फंडातील सरासरी परतावा 12 टक्के पकडून चालूया. याशिवाय यावर चक्रवाढीचाही फायदा मिळतो. 


हेही वाचा:  SIP मध्ये जास्त फायदा हवाय? मग 'या' 4 गोष्टी ध्यानात ठेवा


एसआयपी गुंतवणुकीत तुमचे पैसे वेगाने संपत्तीत रूपांतरित होतात. दीर्घकाळात, तुम्ही SIP द्वारे 30 वर्षे सतत दरमहा 3,000 रुपये गुंतवल्यास, 30 वर्षांत तुम्ही एकूण 10 लाख 80 हजार रुपये गुंतवाल. यावर 12 टक्के दराने तुम्हाला केवळ व्याजातूनच 95 लाख 9 हजार 741 रुपये मिळतील. अशा प्रकारे, 30 वर्षांत तुम्ही 1 कोटी 5 लाख 89 हजार 741 रुपयांचे मालक व्हाल. 


(Desclaimer: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही स्वतः रिसर्च करा किंवा तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)


हेही वाचा: रिटायर्टमेंटनंतर काय येतात आव्हानं? तुम्ही यासाठी सज्ज आहात का?