नवी दिल्ली : दिल्लीतील सराफ बाजारात सोमवारी चांदीच्या दरात घट झाल्याचं पहायला मिळालं.


चांदीच्या किंमतीत घट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे चांदीच्या किंमतीत घट झाली आहे. 


पाहा काय आहे नवा दर


चांदीच्या दरात घट झाली आहे. चांदीच्या दरात १५० रुपयांनी घट झाल्याने चांदीचा दर ३९,५०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.


सोन्याचे दर स्थिर


एकीकडे चांदीच्या दरात घट झाली असताना दुसरीकडे सोन्याचे दर स्थिर राहील्याचं पहायला मिळालं. सोन्याचे दर ३१,४५० रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिर आहेत.


आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या हालचाली आणि शिक्का निर्मात्यांकडून होणाऱ्या मागणीमुळे दरांमध्ये चढ-उतार पहायला मिळत आहे. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याच्या दरात ०.११ टक्क्यांची घट होत ते १,३२१.७० डॉलर प्रति औंसवर पोहोचले. तर, चांदीच्या दरात ०.२४ टक्क्यांनी घट होत १६.५३ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.


देशाची राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा दर क्रमश: ३१,४५० रुपये आणि ३१,३०० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.