नवी दिल्ली : विमान आकाशात असतानाच एका प्रवाशाकडील लॅपटॉपने पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिरूवनंतपुरम-बेंगळुरू दरम्यानच्या प्रवासात इंडिगो कंपनीच्या विमानात ही घडना घडली. विमानातील अग्निशमम दलाच्या मदतीने आगिवर नियंत्रण मिळविण्यात आले. तसेच, सुरक्षेचा उपाय म्हणून विमानाचे सुरक्षितपणे लॅंण्डिंग होईपर्यंत लॅपटॉप पाण्यातच बुडवून ठेवण्यात आला.


आगीवर मिळवले नियंत्रण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना विमान क्रमांक 6E-445 (VT-IGV) मध्ये शनिवारी (11 नोव्हेंबर) घडली. लॅपटॉपला आगल लागल्याचे लक्षात येताच विमानातील प्रवाशांनी क्रू मेंबर्सना तत्काळ माहिती दिली. त्यानंतर विमानातील अग्निशमन विभागाने तातडीची उपाययोजना करून लॅपटॉपच्या आगिवर नियंत्रण मिळवले. तसेच, घटनास्थळाजवळ बसलेल्या प्रवाशांना विमानातच दुसऱ्या ठिकाणी बसविण्यात आले.


अचानक निघाला धूर


इंडिगो कंपनी प्रवक्त्याच्या हवाल्याने इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात, 'तिरूवनंतपुरम-बेंगळुरूसाठी 6E-445 या विमानाने उड्डाण घेतले. दरम्यान, क्रू मेंबर्सला लक्षात आले की, विमानात कुठून तरी धूर निघत आहे. बाराकाईने पाहताच विमानात ठेवलेल्या एका बॅंगमधून धूर येत असल्याचे दिसले. त्यानंतर या घटनेची माहिती वैमानिकाला देण्यात आली. लॅपटॉपची आग विझविण्यात आली. आणि प्रवाशांना दुसऱ्या ठिकाणी बसविण्यात आले.'


या आधीही घडल्यात अशा घटना


दरम्यान, यापूर्वीही काही मोबाईल्सना विमान प्रवासादरम्यान आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्याच महिन्यात दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या एका विमानात मोबाईल फोनला आग लागली होती. तर त्यापूर्वी सप्टेंबर महिन्यात इंडिगो कंपनीच्या विमानात सॅमसंग नोट 2 या स्मार्टफोनला आग लागली होती.