नवी दिल्ली :  पंचकुलामध्ये बाबा रहीम यांच्या विरोधात निर्णय गेल्यानंतर त्यांच्या अनुयायींनी जाळपोळ आणि तोडफोड करायला सुरूवात केली. यामध्ये मिडीयावरही हल्ला करण्यात आला. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री स्मृति इराणी यांनी पंचकूला मधील हिंसेचा निषेध केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिडीयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना त्यांनी चॅनेल्सला कडक इशाराही दिला. 'मिडीयावर झालेल्या हल्ल्याचा आणि झालेले नुकसान निंदनीय आहे. पण मीडीयानेही संयम बाळगत विनाकारण भीतीचे वातावरण करू नये.' असे आवाहन केले आहे.


स्मृती इराणींनी केले ट्विट 



 


एका टिट्वमध्ये लिहताना स्मृती इराणींनी  मिडीयाला कडक इशाराही दिला आहे. 
"फ़ंडामेंटल ऑफ एनबीएसए (न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड अथॉरिटी) च्या नियमांनुसार, तुम्ही तणावाचे वातावरण निर्माण करण्यापासून दूर रहा."