मुंबई : उन्हाळा सुरू झाल्याने आता घराघरात एसीचा वापर देखील वाढला आहे. मार्चमध्येच तापमान 40 अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे मे-जूनमध्ये नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. घरात आपण एसी आणि कूलर लावतो. पण यामधून कधी अचानक साप बाहेर पडला तर? तुम्हाला पण भीतीच वाटेल. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून अनेक जण हैराण झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही तुमचा एसी तपासायला सुरुवात कराल. 


rasal_viper ने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्याला आतापर्यंत 20 लाखाहून अधिक लोकांना पाहिला आहे. शेकडो लोकांनी आपल्या प्रतिक्रियाही यावर दिल्या आहेत. हे दृश्य पाहून बहुतांश लोक घाबरले आहेत.



व्हिडिओमध्ये काय दिसतंय?


या व्हायरल क्लिपमध्ये भिंतीवर टांगलेल्या स्प्लिट एसीमधून एक साप बाहेर लटकताना दिसत आहे. त्याने तोंडात उंदीर पकडला आहे. उंदीर मेला आहे, आणि साप हळूहळू एसीकडे घेऊन जाताना दिसतो. हा व्हिडीओ कुठला आहे हे स्पष्ट झालेले नाही. पण सर्च केल्यानंतर हा व्हिडिओ युट्यूबवर 2017 मध्ये शेअर करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पण हा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.