Snake Hiding In Shoe Video: पावसाळ्यात जीव जंतूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळतो. त्याचबरोबर साप दिसण्याचं प्रमाण देखील या काळात जास्त असतं. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. कपडे, बूट नीट तपासून झाडून नंतरच घाला. कारण यात साप लपलेला असू शकतो. कदाचित तुम्हाला खोटं वाटेल, पण व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या यावर विश्वास बसेल. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर बुटात एक साप लपल्याचं दिसत आहे. इतका मोठा साप कसा काय? बुटात लपू शकतो, याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका बुट स्टॅंडवर काही बुट ठेवल्याचं दिसत आहे. बुट घालणाऱ्या महिलेला बुटात साप लपल्याचा अंदाज येतो. त्यामुळे ती एक स्टीक घेऊन बुट तपासताना दिसत आहे. इतक्यात एक भला मोठा साप फणा काढून बाहेर येतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर धडकी भरते. त्यामुळे पावसाळ्यात काळजी घेणं गरजेचं आहे, असा संदेश व्हायरल व्हिडीओवर दिला आहे. 



53 सेकंदाचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडियावर शेअर करत आहे. अनेक युजर्संनी कमेंट्स टाकून काळजी घेण्याच्या सूचना केली आहे.