नवी दिल्ली : उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे इथला जम्मू-काश्मीर हायवेही बंद करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरवर संपूर्ण बर्फाची चादर पांघरल्याचं चित्र पहायला मिळतयं. यामुळे, इथल्या जवळपास दोन हजार गाड्या अडकल्या आहेत. बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, सफरचंदाच्या शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंगराळ भागात बर्फवृष्टीमुळे सगळीकडे पांढरी चादर पसरली आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये चारी बाजुला बर्फ पसरला आहे. बर्फवृष्टीमुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं आहे.


पर्यटक मात्र याचा आनंद घेत आहेत. बर्फवृष्टीमुळे परिसर आणखी सुंदर दिसू लागला आहे. पण मध्ये मध्ये बर्फवृष्टी वाढल्याने लोकांना घरात अडकून बसावं लागतं आहे.


जम्मू-काश्मीरच नाही तर हिमाचल प्रदेशमध्ये ही बर्फवृष्टी सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर बर्फ साचल्याने रस्ते वाहतूक बंद झाली आहे. बर्फवृष्टीमुळे बागांचं नुकसान झालं आहे. अनुच्छेद 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये व्यवसाय आणि व्यापारामध्ये ३ महिने जितकं नुकसान नाही झालं तितकं नुकसान या बर्फवृष्टी दरम्यान झालं आहे.