नवी दिल्ली : सोशल मीडिया स्टार हिमांशी नावाच्या तरूणीचा मृतदेह शनिवारी यमुना नदी किनारी सापडल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. महत्त्वाचं म्हणजे 24 जून रोजी घरातून बाहेर गेल्यानंतर ती पुन्हा घरी  परतलीचं नाही, त्यामुळे पोलिसांत हिमांशी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. पोलीस तिचा शोध घेतील त्या आधीचं हिमांशीचा दोन दिवसांनंतर मृतदेह सापडला. बुराडी पोलीस स्थानकात हिमांशी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'संतनगर बुराडी  येथे राहत असलेली हिमांशी सकाळीचं घरातून निघून गेली, रात्री उशिर झाला तरी ती घरी परतलीचं नाही. शिवाय तिचा फोन देखील बंद आहे.' अशी तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांना हिमांशीच्या शेवटच्या लोकेशनबद्दल माहिती मिळाळी.



तपासादरम्यानचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्यानंतर हिमांशी सिग्नेचर ब्रिजच्या दिशेने जाताना दिसली. हिमांशीने 24 जून रोजी जवळपास  दुपारी 3 वाजेच्या सुमारास यमुना नदीत उडी मारली असवी असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर मृतदेह शनिवारी यमुना नदी किनारी सापडली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिमांशीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे निशान नव्हते. याप्रकरणी पोलीस पुढील तपासणी करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे हिमांशीची आत्महत्या आहे की हत्या याचा पोलीस शोध घेत आहेत.