मुंबईसो : शंकराचा वेष धारण करणारा हा चेहरा ओळखीचा वाटतोय का? अहो हे तर तेज प्रताप यादव... आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आणि बिहार सरकारचे माजी आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तेज प्रताप यादव यांनी एका मंदिरात पूजा-अर्चना केली. यावेळी त्यांनी गळ्यात माळा आणि अंगाला भस्म फासला होता. त्यावेळचे हे फोटो आहेत. परंतु, सोशल मीडियावर मात्र तेज प्रताप यांच्या या अवताराची चांगलीच खिल्ली उडवली जातेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक युझर म्हणतो, 'यांना बिहारचा महादेव म्हणून घोषित करायला हवं'



तर आणखीन एक युझर म्हणतेय, 'लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव रणवीर सिंहला मोठी टक्कर देत आहेत'



'यांना हिरो बनायचं होतं, पण वडिलांनी मात्र जबरदस्तीनं नेता बनवलं. बिचारे काहीच बनू शकले नाहीत' असं एकानं म्हटलंय.






तर एका युझरनं 'पशुंचा चारा खाल्यानंतर कसे नमुने तयार होतात, हे तेज प्रताप यादव यांना पाहून लक्षात येईल' असं म्हणत यादव पिता-पुत्रांवर निशाणा साधलाय.



उल्लेखनीय म्हणजे, असा वेष धारण करून चर्चेत येण्याची ही तेज प्रताप यादव यांची पहिलीच वेळ नाही. याआधीही काही दिवसांपूर्वी तेज प्रताप यादव यांनी एका गोशाळेत जाऊन बासरी वाजवली होती. तेव्हा अनेकांनी त्यांना कन्हैया म्हणायाला सुरुवात केली होती.