`माफी मागते, माझा तो हेतू नव्हता` इन्फ्लुएन्सर अर्चनाने शीख बांधवांची का मागितली माफी?
Archana Makwana Yoga Controversy: अर्चना मकवाना असे तिचे नाव असून ती एक फॅशन डिझायनर आणि `लाइफस्टाइल इन्फ्लुएंसर आहे.
Archana Makwana Controversy: सुवर्ण मंदिरासमोर योगा करुन त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा प्रकार एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने केला होता. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) या तरुणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. अर्चना मकवाना असे तिचे नाव असून ती एक फॅशन डिझायनर आणि 'लाइफस्टाइल इन्फ्लुएंसर आहे. गोल्डन टेम्पलसमोरील योगामुळे अर्चना चांगलीच अडचणीत आली आहे.
अर्चनाविरोधात 'धार्मिक भावना दुखावल्याचा' ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र अर्चना मकवानाने याप्रकरणी आता माफी मागितली आहे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचे तिने म्हटले आहे. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सुवर्ण मंदिराच्या आवाराच अर्चना मकवानाने परिक्रमा योगासने केली.
गुरुद्वारांची सर्वोच्च संस्था असलेल्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) गोल्डन टेम्पल येथील 3 कर्मचाऱ्यांनादेखील निलंबित केले. आपले कर्तव्य नीट पार न पाडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. मकवाना यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्तांकडे तक्रार पाठवण्यात आल्याची माहिती एसजीपीसीचे प्रमुख हरजिंदर सिंग धामी यांनी माध्यमांना दिली.
पाहा पोस्ट
'सुवर्ण मंदिरात शीख आचरणाविरुद्ध कृत्य करण्याची परवानगी कोणालाही दिली जाऊ शकत नाही. पण काही लोक या पवित्र स्थानाचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व जाणूनबुजून दुर्लक्षित करून आक्षेपार्ह कृत्य करतात, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. 'या कृतीमुळे शिखांच्या भावना आणि सन्मान दुखावला गेला आहे, त्यामुळे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे ते म्हणाले.
नंतर मकवाना यांनी त्यांच्या 'इन्स्टाग्राम' हँडलवरील पोस्टमध्ये शीख बांधवांची माफी मागितली. मी कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने काहीही पोस्ट केले नाही. गुरुद्वारा साहिब परिसरात योगाभ्यास करणे काही लोकांसाठी आक्षेपार्ह असू शकते हे मला माहीत नव्हते. कोणाला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता, असे अर्चनाने म्हटले. 'मी मनापासून माफी मागते आणि भविष्यात अधिक काळजी घेईन असे वचन देते. कृपया माझी माफी स्वीकारा', असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.