नवी दिल्ली : संपूर्ण जग सध्या कोरोनाशी लढा देतंय. कोरोना पूर्णपणे बरा करेल अशी लसं न निघाल्याने त्यावर मात करणं कठीण झालंय. अशावेळी एक दिलासादायक बातमी वैज्ञानिकांच्या हवाल्याने येत आहे. चेन्नईच्या वैज्ञानिकांच्यामते कोरोना वायरस आणि सुर्यग्रहणामध्ये थेट संबंध आहे. कोरोना व्हायरसला सुर्यग्रहणाशी जोडलं जातंय. २१ जूनला सुर्यग्रहणाच्या दिवशी कोरोना नष्ट होईल असे त्यांचे थेट म्हणणे आहे. कोरोनावर उपाय सापडत नाही म्हणून आधीच दुनिया त्रस्त आहे. अशावेळी जर सत्य होणार असेल तर अनेकजण याची वाटच पाहत असतील. या दाव्यात किती तथ्य आहे हे देखील येणाऱ्या सुर्यग्रहणानंतर स्पष्ट होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२६ डिसेंबर २०१९ ला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला जो २१ जून २०२० ला संपेल. सूर्यग्रहणानंतर उत्सर्जित झालेल्या विखंडन उर्जेमुळे कोरोना विषाणूचे विभाजन होईल आणि पहिल्या न्युट्रॉनच्या उत्परिवर्तित कणाच्या संपर्कात येऊन कोरोना वायरस नष्ट होईल असे परमाणू आणि पृथ्वी वैज्ञानिक डॉ. केएल सुंदर कृष्ण यांचे म्हणणे आहे. २६ डिसेंबरच्या सुर्यग्रहणानंतर सुर्यमंडळात ग्रहांच्या स्थितीत बदल झालाय. यानंतर अंतर-ग्रह बल आणि उर्जेच्या भिन्नतेसमुळे वायरस वरच्या वायुमंडळातून उत्पन्न होतोय. या बदलामुळे कोरोना वायरससाठी पोषक वातावरण झाल्याचे त्यांनी सांगितले. 


देशात कोरोनाचा कहर सुरुच, १० हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू


न्यूक्लियॉला न्यूक्लिकर करण्यास सुरुवात झालीय. न्यूक्लियर बनण्याची ही प्रक्रिया बाहेरील मटेरीयलमुळे सुरु होईल. वरच्या वायुमंडळात बायो मॉलिक्यूल आणि बायो न्यूक्लियरच्या संपर्कात येऊन हे होऊ शकते. 



यामुळे आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही. ही सौर यंत्रणेत होणारी एक नैसर्गिक हालचाल आहे. सूर्यग्रहण हा एक नैसर्गिक उपाय देखील असू शकतो जो आपल्याला या कोरोनाच्या साथीपासून मुक्त करेल. सूर्य किरण आणि सूर्यग्रहण हा या विषाणूचा नैसर्गिक उपचार आहे. आगामी सूर्यग्रहण व्हायरस कोरोनाला निष्क्रिय करेल असे ते म्हणाले.