मुंबई : कश्मीरमध्ये उडी सेक्टरमध्ये ७ ऑगस्ट २०१७ मध्ये दहशतवाद्यांच्या हल्लात जखमी झालेले जवान नरेंद्र सिंह यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ते तैनात होते. फोर्थ गढवाल राइफलचे ते जवान होते. दहशतवाद्यांची चकमकीत त्यांना गोळी लागली होती. त्यानंतर त्यांना जम्मुतील मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.


शहिदाचं पार्थिक आज संध्याकाळी सेलाकुई येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहे. शहीद नरेंद्र सिंह यांचं पार्थिव विमानाने जौलीग्रांट एअरपोर्टवर आणलं जाणार आहे. तेथून त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे. लष्करी इतमामात त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. या बातमीनंतर त्यांच्या घरी दु:खाचा डोंगर कोसळला आहे.