OYO Hotel Viral News : पती पत्नी आणि पत्नीच्या माहेरीची मंडळी यावर सोशल मीडियावर आपण अनेक गंमतीशीर जोक आणि अनेक मिम्सही पाहिले आहेत. रोज नवीन नवीन मिम्सही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पत्नीच्या माहेरची मंडळी हा जावयासाठी सगळ्यात न आवडता विषय असतो. सासू आणि जावयाचं नातं तसं पाहिलं तर आई आणि मुलासारखं असतं. पण भारतात जावयासमोर सासूचं नाव घेतलं तो अनेक जण वैतागतात. फार कमी जावई आणि सासूचं नातं हे प्रेम आणि आपुलकीचं असतं. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. जेव्हा पतीला पत्नीने सांगितलं की, तिची आई म्हणजे त्याची सासू येणार आहे. हे समजताच त्याने ओयोमध्ये रुम बूक केली. पतीची ही भांडगड पत्नीला समजतात पुढे तिने काय केलं पाहूयात. (Son in law booked a room in OYO Hotel for mother in law to come home wife came to know the truth viral news )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर @gherkekalesh या अकाउंटवरून एका पतीने त्याचा आयुष्यात घडलेल्या घटनेबद्दल सांगितला आहेय. त्या व्यक्तीने या पोस्टमध्ये लिहिलंय की, त्याचा पत्नीने गेल्या आठवड्यात सांगितलं की, माझ्या सासूबाई आणि काही माहेरची मंडळी घरी येणार आहेत. हे माझ्यासाठी खूप टॉक्सिक होतं. ती लोकं आली की माझ्या 3 बीएचकेच्या घरात खूप गोंधळ करतात. त्यामुळे त्यांना टाळण्यासाठी मी एक पर्याय शोधला. ती मंडळी येणार होती तेव्हाच मी कामासाठी बाहेर जाणार असं पत्नीला सांगून पण प्रत्यक्षात मी ओयो हॉटेलमध्ये 3 दिवसांसाठी एका आलिशान रूमचे बुकिंग केली. तिथे असलेल्या एक किंग साइज बेडवर मी आरामात झोपलो. मी आणि माझे तिन्ही मित्रांनी तिथे स्पा डेची मजा केली. ते माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होतं. पण यानंतर या उपायाचा मला मोठा फटका बसला. 



मी पत्नीशी खोटं बोललो याचं मला खूप वाईट वाटतं होतं. म्हणून मी माझ्या पत्नीला सगळं खरं सांगायचं ठरवलं. पण माझ्या हा प्रामाणिकपणे मला चांगलाच महागात पडला. त्याला वाटलं पत्नीला सत्य सांगितलं त्याचा वाईट परिणाम होईल, असं मनातही आलं नाही. पण पत्नीला सत्य सांगितल्यावर तिने मला जी शिक्षा दिली ती ऐकून तुम्ही अवाक् व्हाल. तिने माझ्या नातेवाईकांना 10 दिवसांसाठी घरी राहण्यासाठी बोलवलं. एवढंच नाही तर यानंतर तिने माझं क्रेडिट कार्ड घेऊन ती मात्र गोव्याला मजा करायला गेली. सोबत मित्रमैत्रिणींनी घेऊन गेली. पत्नीच्या या अनोख्या शिक्षेमुळे मानसिक आणि आर्थिक असा दोन्ही फटका बसला. यावर त्या व्यक्तीने सोशल मीडियावर विचारलं की, सत्य सांगून पतीला काही चांगलं झालं की वाईट हे त्याला समजत नाहीय. मात्र सोशल मीडियावर त्याचा या पोस्टनंतर युजर्सला हसू आवरत नाहीय.