बंगळुरु : कोरोना विषाणूच्या साथीमुळे सध्या देशात लॉकडाऊन आहे. लोकांना घराबाहेर जाण्यास बंदी आहे, कोणताही मोठा कार्यक्रमास बंदी आहे. परंतु या सर्व निर्बंधांव्यतिरिक्त कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी यांचे शुक्रवारी मोठ्या थाटामाटात लग्न झालं. निखिल कुमारस्वामीचे लग्न बंगळुरूच्या रामनगरमध्ये अत्यंत रॉयल पद्धतीने झाले. येथे मीडियावर बंदी होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विवाहाबद्दल आता अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, कारण एकीकडे लोकांना देशभर सामाजिक अंतर राखण्यास सांगितलं जात आहे. दुसरीकडे व्हीव्हीआयपी सवलत दिली जात आहे.


एचडी कुमारस्वामी यांचे पुत्र निखिलचे लग्न काँग्रेस सरकारमधील माजी मंत्री एम. कृष्णाप्पा यांची भाची रेवतीशी झाले. मीडियाला येथे परवानगी नव्हती. रामनगरमधील फार्म हाऊस येथे रॉयल वेडिंगचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी जवळपास 30-40 वाहनं आली होती.


स्थानिक पोलिसांनी सांगितले की, काही गाड्यांचे नंबर कुटुंबीयांनी दिले होते, फक्त त्या वाहनांना कार्यक्रमाला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.



लॉकडाऊनमुळे केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या काळात कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांना मान्यता देण्यात येऊ नये हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. एचडी कुमारस्वामी यांना याबद्दल विचारले गेले तेव्हा त्यांनी सांगितले की, माझ्याकडे लग्नासंदर्भात सर्व प्रकारच्या परवानग्या आहेत. याशिवाय डॉक्टरांकडून अनेक प्रकारचे सल्लाही घेण्यात आले आहेत.


अधिक वाचा: कोरोना लॉकडाऊनमधील अनोखा लग्नसोहळा


राज्य सरकारने या लग्नात केवळ 70 ते 100 लोकांनाच हजर राहण्याची परवानगी दिली आहे. तसेच राज्य सरकारने लग्नाची व्हिडिओग्राफी केली असून त्याद्वारे सामाजिक अंतर पाळले जाते की नाही यावर लक्ष ठेवले गेले.


शुक्रवारपर्यंत कोरोनाचे 300 पेक्षा जास्त प्रकरणे रुग्ण येथे आढळली आहेत. तर राज्यात 13 लोकांचा मृत्यू झाला आहे.