Sonali Phogat Death : भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट (Sonali Phogat ) यांचा  हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) गोव्यात (goa) मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत कुटुंबियांकडून शंका उपस्थित करण्यात येत होती. शवविच्छेदनानंतर सोनाली फोगाट यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सोनाली फोगट यांच्या  भावाने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर याप्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सोनाली फोगट यांचे पीए आणि सुधीर सांगवान आणि त्यांचा मित्र सुखविंदरवर गोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गोवा पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.


शवविच्छेदन अहवालानंतर सोनाली यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्या होत्या. मात्र, अंतर्गत अवयवांना जखमा जास्त झाल्याची माहिती समोर आली. यावरून सोनाली यांच्यासोबत हाणामारी झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचवेळी सोनाली फोगट यांना काही विषारी द्रव्य दिल्याचाही संशय बळावला आहे.


दरम्यान, सोनाली यांच्या पीएवर बलात्कार आणि त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.  सोनाली फोगट 22 ऑगस्ट रोजी गोव्यात आली होती. सोनाली यांच्यासोबत तिचा पीए सुधीर सांगवान आणि  मित्र सुखविंदर होता. 


सोनाली यांच्या पीएवर कुटुंबीयांनी खूप गंभीर आरोप केले आहेत. सोनाली फोगटचा भाऊ रिंकू ढाका याने गोव्यातील अंजुना पोलीस ठाण्यात 4 पानी तक्रार दिली आहे, ज्यामध्ये सोनालीचे लैंगिक शोषण आणि तिच्या मालमत्तेवर अतिक्रमण केल्याचे आरोप केले आहेत.


सोनाली फोगाट यांनी भाजपच्या (BJP) तिकीटवर हरियाणामधील आदमपूर विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र ही निवडणूक त्या हरल्या होत्या. भाजपने सोनाली यांची हरियाणा युनिटच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली होती.