Sonia and Rajiv Gandhi Love Story : भारताचे माजी पंतप्रधान, राजीव गांधी (Rajiv Gandhi ) आणि त्यांच्या पत्नी सोनिया गांधी (Sonia Gandhi) ही जोडी जेव्हाजेव्हा समोर आली, तेव्हातेव्हा त्यांच्या नात्यात असणारं प्रेम, एकमेकांप्रती असणारा आदर या भावना प्रकर्षानं पाहायला मिळाल्या. भारतातील राजकारणात अतिशय नावाजलेल्या कुटुंबापैकी एक असणाऱ्या गांधी घराण्यात सोनिया गांधी यांच्या येण्याचा किस्सा फारच रंजक होता. सहसा या कुटुंबाचा उल्लेख राजकारण आणि तत्सम चर्चांच्याच निमित्तानं केला जातो. पण, सोनिया आणि राजीव गांधी यांच्या प्रेमाचा प्रवास फारच क्वचित प्रसंगी सर्वांसमोर आला. प्रेमात आकंठ बुडालेली एखादी व्यक्ती काय काय करु शकते याची तुम्हाला कल्पना असल्यास या Love Story विषयी साधारण अंदाज तुम्हाला येऊ शकतो. 


कुठून झाली या नात्याची सुरुवात? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केम्ब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी महाविद्यालयापासून या प्रेमाच्या नात्याची सुरुवात झाली. तिथं 21 वर्षीय राजीव 1965 या वर्षी इंजिनियरिंगसाठी पोहोचले होते. सोनियासुद्धा तिथेच शिकण्यासाठी गेल्या होत्या. पण, त्यांचे कॅम्पस मात्र वेगवेगळे होते. अश्विनी गांधी यांनी ‘द लोटस इयर्स – पॉलिटिकल लाइफ़ इन इंडिया इन द टाइम ऑफ़ राजीव गांधी’ या पुस्तकात त्या दिवसांचा उल्लेख केला आहे. 


हेसुद्धा वाचा : Amitabh Bachchan Birthay : ... का तुटलं गांधी कुटुंबाशी असणारं बिग बींचं नातं?


हे तेच दिवस होते जेव्हा राजीव गांधी आणि सोनिया तिथंच असणाऱ्या एका रेस्तराँमध्ये जात होते. एके दिवशी त्या ग्रीक रेस्तराँमध्ये राजीव गेले आणि त्यांची नजर सोनियावर पडली. सोनियानं आपल्या शेजारच्या टेबलवर बसावं यासाठी राजीव यांनी रेस्तराँ मालक चार्ल्स अँटनी यांना कसंबसं तयार केलं. या कामासाठी चार्ल्सनं त्यांच्याकडून दुपटीनं पैसे घेतले. लाचच म्हणा. प्रेमात आपण अनेक मर्यादा ओलांडतो, इतरांना वेडेपणा वाटेल असंही काहीतरी करतो. राजीव गांधी यांनीसुद्धा प्रेमाखातर असंच काहीसं केलं होतं. 


... आणि प्रेम व्यक्त केलंच 


विद्यापीठ परिसरातील सर्वच विद्यार्थी ज्या रेस्तराँमध्ये जात होते तिथेच सोनिया आणि राजीवही जायचे. सोनिया यांना पाहून राजीव त्यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. शेवटी धाडस करून त्यांनी टिश्यूपेपरचा आधार घेत मनातील भावना व्यक्त केल्या आणि त्या वेटरच्या मदतीनं सोनियांपर्यंत पोहोचवल्या. ते सर्वकाही वाचून सोनिया काहीशा संकोचल्या. यामध्ये एका जर्मन मित्रानं त्यांच्यामध्ये मध्यस्ती केली आणि पाहता पाहता हे नातं एका सुरेख वळणावर पोहोचलं. 


कुटुंबाविषयी काहीच माहिती नव्हती... 


राजीव गांधी यांच्यावर प्रेम असूनही सोनिया यांना त्यांच्या कुटुंबाविषयी फार माहिती नव्हती. किंबहुना राजीव यांनीसुद्धा त्यांना काहीच कल्पना दिली नव्हती. एके दिवशी परदेशातील वर्तमानपत्रामध्ये इंदिरा गांधी यांच्याविषयीची बातमी छापून आलवी आणि हा तोच क्षण होता जेव्हा राजीव गांधी इंदिरा गांधी यांचे सुपुत्र आहेत हे सोनिया यांच्या लक्षात आलं. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतोय, त्या व्यक्तीची ही जगाला असणारी ओळख त्यावेळी सोनिया यांच्यापर्यंत पोहोचली होती. प्रेमाचं हे नातं पुढे लग्नापर्यंत पोहोचलं. पण, राजीव यांच्या निधनानंतर मात्र त्या पुरत्या कोलमडल्या. कसंबसं या साऱ्यातून सावरत त्यांनी भारतीय राजकारणातही उडी घेतली आणि एका नव्या प्रवासाची सुरुवात केली.