Sonia Gandhi BJP Prime Ministerial Candidate: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपावर हल्लाबोल केला. गुजरातमध्ये काही महिन्यांवर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी काँग्रेसवरही टीकेचे बाण सोडले. अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, "राज्यात आपले अस्तित्व वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये भाजपा मुख्यमंत्री बदलत आहे." सीएम केजरीवाल यांनी गुजरातमध्ये नेतृत्व बदलाचा संदर्भ दिला. कर्नाटक, उत्तराखंड आणि त्रिपुरामध्येही अलिकडच्या वर्षांत असेच बदल झाल्याचं त्यांनी सांगितलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल उपरोधिक टोला लगावला. केजरीवाल यांनी सांगितली की, "मी ऐकले आहे की पंतप्रधान मोदींनंतर सोनिया गांधी पंतप्रधानपदासाठी भाजपाच्या पुढील उमेदवार असतील." आम आदमी पक्ष मेधा पाटकर यांचा पक्षप्रवेश निश्चित करत असल्याच्या दाव्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांचा हा उपरोधिक टोला होता. जवळपास 27 वर्षांपासून राज्यात सत्ता गाजवणाऱ्या भाजपावर टीका करत म्हणाले की, "आता घाबरण्याची गरज नाही. भाजपा जात आहे, आम आदमी पक्ष सत्तेवर येत आहे. राज्यात जे काही घोटाळे झाले आहेत, त्यांची चौकशी करून जनतेचे पैसे परत मिळतील. हा पैसा आम्ही सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी वापरू.", असे ते म्हणाले.


एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी काँग्रेसवरही सडकून टीता. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, "काँग्रेस संपली आहे. त्यांची चौकशी करणे थांबवा."