मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडी कार्यालयाने नॅशनल हेराल्ड प्रकरणामुळे मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीसाठी कार्यालयात हजर झाल्या. याप्रकरणी सोनिया गांधीची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी दिल्लीत आणि मुंबईमध्ये कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान सोनिया गांधी यांचं घर असलेल्या 10 जनपथ आणि अकबर रोडवर मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आलाय. ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले असून अकबर रोड हा रस्ता रहदारी साठी बंद करण्यात आलाय. दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून पाण्याचा फवारा मारण्यात आला. मुंबईतही ईडीच्या कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा निघाला. 



मुंबईत सकाळी 11 वाजता जीपोओ चौकातून निघलेल्या मोर्चामध्ये नाना पटोले, भाई जगताप, अशोक चव्हाण, चरणसिंह सप्रा तसेच इतर पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर, महाराष्ट्रासोबतच देशभरात काँग्रेस पक्षाकडून ई़डी विरोधात आंदोलन केलं जातंय. 


याआधी गेल्या महिन्यात नॅशनल हेराल्ड प्रकरणामुळे राहूल गांधी यांची ईडी कडून चौकशी झाली होती. त्यावेळी ईडी विरोधात काँग्रेस पक्षाकडून संपूर्ण देशात आंदोलने करण्यात आले होते. त्यावेळी, काँग्रेस पक्षाकडून दिल्ली येथे विरोध दर्शवून गांधी कुटुंबावरील हे मनी लाँन्ड्रिंगचे आरोप निराधार असल्याचं सांगण्यात आलं होतं. 


सोनिया गांधींना ईडीचं समन्स 


याआधी सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी कर्यालायने चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. पण त्यावेळी सोनिया गांधींना कोरोना झाल्यामुळे त्या ईडीच्या चौकशीसाठी हजर राहू शकल्या नाहीत. त्यांनी ईडीला पुढील तारीख मागितली होती. राहुल गांधी मात्र ई़डी चौकशीसाठी हजर  राहिले होते. त्यावेळी राहूल गांधींना 5 दिवसात जवळपास 50 तासांची चौकशीला सामोरं जावं लागलं होतं.