Good News : अशी करा स्वस्तात सोने खरेदी, 1 मार्चपासून पुन्हा संधी
आता तुम्हाला स्वस्तात सोने खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे.
मुंबई : सध्या कोरोनाचा काळ आहे. कोरोना काळात सोने (Gold) दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. सोने दर 50 हजार रुपयांच्या घरात पोहोचला होता. मात्र, अनलॉक सुरु झाल्यानंतर सोने दरात मोठी घसरण होण्यास सुरुवात झाली होती. पुन्हा सोने दरात वाढ होताना दिसत आहे. आता तुम्हाला स्वस्तात सोने खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे.1 ग्रॅम सोने 4,612 रुपयांना मिळेल. 1 मार्चपासून सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold bond ) विक्रीस प्रारंभ होणार आहे.
सॉवरेन गोल्ड बॉन्डमधील बॉन्डची (Sovereign Gold bond ) नवीन इश्यू किंमत प्रति ग्रॅम 4,662 रुपये निश्चित करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सॉवरेन गोल्ड बॉन्ड 2020-21 (Series 12th)ची विक्री 1 ते 20 मार्च, 2021 दरम्यान होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आदेशानुसार ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांना प्रति ग्रॅम 50 रुपये सवलत देण्याचा निर्णय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे. अशा गुंतवणूकदारांना 1 ग्रॅम सॉवरेन गोल्ड बॉन्ड 4,612 रुपये दराने दिले जाईल.
8 वर्षे गोल्ड बॉन्ड
हे सॉवरेन गोल्ड बॉन्ड 8 वर्षांसाठी दिले जातात आणि 5 वर्षांनंतर यातून बाहेर पडण्याचा पर्याय देखील आहे. सोने खरेदी किमान 1 ग्रॅम आणि त्याच्यापुढे तो सोने खरेदी करु शकतो.
4 किलोपर्यंत सोने (GOLD) खरेदी करता येते
एखादा गुंतवणूकदार किमान 1 ग्रॅम आणि 4 किलोपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकतो. हिंदु अविभाजित कुटूंबासाठी (HUF) 4 किलोपर्यंत आणि ट्रस्टसाठी एका वर्षात 20 किलो गुंतवणूकची परवानगी आहे.
Sovereign गोल्ड बॉन्ड योजनेची वैशिष्ट्ये
ही योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. याद्वारे, फिजिकल गोल्डची मागणी कमी करण्यासाठी आणि सोने खरेदीसाठी वापरण्यात येणारी घरगुती बचत आर्थिक बचतीत वापरण्यासाठी करण्यात आली. घरात सोने खरेदी करण्याऐवजी जर तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही करही वाचवू शकता.
500 ग्रॅम सोने खरेदी
Sovereign गोल्ड बॉन्ड योजनेत गुंतवणूक करणारी एखादी व्यक्ती व्यवसाय वर्षात 500 ग्रॅमपर्यंत सोन्याचे बॉन्ड ( 500 gram Gold buying) खरेदी करू शकते. त्याचवेळी, किमान गुंतवणूक एक ग्रॅम आहे. कोणतीही व्यक्ती किंवा एचयूएफ व्यवसाय वर्षात जास्तीत जास्त 4 किलो सोन्याचे बॉन्ड खरेदी करू शकते. एकूणच, बॉन्ड्स स्वतंत्रपणे खरेदी करण्याची मर्यादा 4 किलो आहे. 20 किलो ट्रस्ट किंवा संस्थेसाठी ठेवण्यात आले आहे. या योजनेचा मुदतपूर्व कालावधी 8 वर्षे आहे. आपल्याला अद्याप बॉन्ड विक्री करायचे असल्यास आपल्याला कमीतकमी 5 वर्षे प्रतीक्षा करावी लागेल. आपण या योजनेत गुंतवणूक करून कर वाचवू शकता. या योजनेंतर्गत गुंतवणुकीवर 2.5 टक्के व्याज मिळणार आहे.