Gold Bond मध्ये गुंतवणूक करण्याची पुन्हा संधी; RBIने निश्चित केली प्रति ग्रॅमची किंमत; वाचा डिटेल्स
गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक करण्याची पुन्हा शानदार संधी येणार आहे. 30 ऑगस्टपासून पुढील 5 दिवस गुंतवणूक करता येणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार रिझर्व बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, सरकारी सुवर्ण बॉंडच्या 6 व्या स्किमची सुरूवात 30 ऑगस्टपासून होणार आहे.
नवी दिल्ली : गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक करण्याची पुन्हा शानदार संधी येणार आहे. 30 ऑगस्टपासून पुढील 5 दिवस गुंतवणूक करता येणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार रिझर्व बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, सरकारी सुवर्ण बॉंडच्या 6 व्या स्किमची सुरूवात 30 ऑगस्टपासून होणार आहे.
गुंतवणूकदारांसाठी तारीख
सरकारी सुवर्ण बॉंडची पुढील म्हणजेच 6वी स्किम 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत सुरू असणार आहे.
प्रति ग्रॅम किंमत निश्चित
30 ऑगस्टपासून तुम्ही Government Gold Scheme मध्ये गुंतवणूक केल्यास त्यासाठी RBIने प्रति ग्रॅम 4732 रुपये किंमत ठेवली आहे.
ऑनलाईन खरेदीवर 50 रुपयांची सूट
सरकार रिझर्व बँकेच्या सल्ल्याने ऑनलाईन अप्लाय करणे तसेच डिजिटल पद्धतीने पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदरांसाठी 50 रुपयांची सूट देणार आहे.
याआधी सरकारने मे 2021 पासून सप्टेंबर 2021 दरम्यान, 6 स्किममध्ये सरकारी सुवर्ण बॉंड जारी करण्याची घोषणा केली होती. RBI भारत सरकारतर्फे गोल्ड बॉंड जारी करीत असते.