Sovereign Gold Bond Scheme: सोन्याच्या किमती (Gold Price Today) या दिवसेंदिवस गगनाला भिडल्या आहेत. त्यातून आपल्यालाही सोनं खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात घ्यावा लागतात. स्वस्त सोनं आपल्याला कधी खरेदी करता येणार याबद्दलही आपल्याला जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण अशी एक सरकारी योजना (Government Scheme) आहे ज्यातून आपण स्वस्त सोनं खरेदी करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या सरकारी योजनेबद्दल, आज हे स्वस्त सोनं खरेदी करण्याची शेवटीची तारीख आहे. तुम्हीही स्वस्त सोनं होण्याची वाट पाहत आहात? तुम्हाला स्वस्त सोनं खरेदी करायचे आहे? तर चला तर मग जाणून घेऊया की सॉवरेन गोल्ड बोन्डमधून (Sovereign Gold Scheme) तुम्ही कशाप्रकारे स्वस्त सोनं खरेदी करू शकता? आज हे स्वस्त सोनं खरेदी करण्याचा शेवटचा दिवस आहे. तुम्हाला हे सोनं विकत घेण्यासाठी ऑनलाईन पमेंट (Online Payment) करावी लागेल. 


तुम्हाला कसा होईल फायदा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला रिझर्व्ह बॅंककडून (Reserve Bank of India) मिळणाऱ्या या योजनेतून दुकानापेक्षाही स्वस्त सवलत मिळते. त्यामुळे तुम्ही यात चांगली गुंतवणूक करू शकता. सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सरकार डिस्काऊंट देते. रिझर्व्ह बॅंकेकडून तुम्हाला सोन्यावरील म्हणजेच गोल्ड बॉन्डवरील इश्यू प्राईस (Issue Price) ही 5,611 रूपये आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी सॉवरेन गोल्ड बॉंण्ड्सच्या चौथ्या सीरिजमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. तिसरी स्किम ही डिसेंबर 2022 मध्ये रिलिज झाली होती. या वर्षीच्या आर्थिक वर्षानुसार, सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्किम ही 6 मार्चपासून सुरू झाली आहे. ही चौथ्या सिरिजमधील (Sovereign Gold Bond Fourth Scheme) स्किम आहे. जी या वर्षातली शेवटची स्किम आहे. 


जाणून घ्या या स्किमविषयी 


वर म्हटल्याप्रमाणे, सरकार तुम्हाला यावर सुट देते. येथे तुमचं सोनं हे किती प्रमाणात शुद्ध आहे त्यावरून तुमच्या सोन्याच्या बॉन्डची (Bond Price) इशु प्राईस ठरते. येथे तुमचे सोनं हे किमान 999 प्युरिटीचे असणं आवश्यक आहे. तुम्हाला जर का रिझर्व्ह बॅक ही 5,611 रूपये प्रति ग्रॅम इशु प्राईस देत असेल तर तुम्हाला यातून 50 रूपये कमी म्हणजे 5,561 रूपयांची खरेदी करता येईल.


लॉक इन पिरियड (Lock In Period) किती? 


येथे सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे तुमचा लॉन इन पिरियड कारण यावरही अनेक गोष्टी या अवलंबून असतात. गोल्ड बॉन्डसाठी लॉनइन पिरियड हा आठ वर्षे एवढा आहे. तुम्ही डिजिटलीही गोल्ड लॉक करण्याची सुविधा आजमावू शकता. तेव्हा अजिबातच वेळ घालवू नका, आजच गोल्ड बॉन्ड विकत घ्या.