Crime News : देशभरात अनेक राज्यांमध्ये ईडीच्या धाडी सुरु आहेत. अनेक नेत्यांच्या मागे ईडीची पीडा लागल्याचं दिसत आहे. विरोधी पक्षातील नेते केंद्रातील सरकारवर यावरून प्रखरपणे टीका करताना दिसत आहेत. मात्र अशातच एका माजी आमदाराला ईडीमधून बोलत असल्याचा फोन येतो. मला 3 कोटी द्या नाहीतर रेड पडेल अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीने दिली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय आहे प्रकरण -


पंजाबचे सुलतानपूरमधील लोधीचे काँग्रेस आमदार नवतेज सिंह चीमा यांना एक फोन कॉल येतो. त्यामध्ये त्यांना अज्ञात व्यक्ती 3 कोटी रूपयांची मागणी करतो. पैसे दिले नाही तर रेड पडेल अशी धमकीही देतो. त्यानंतर नवतेज सिंह चीमा यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि याबाबत तक्रार नोंदवली.
 


 



पोलिसांनी नवतेज सिंह चीमा यांना आलेला मोबाईल नंबर ट्रेस केला. त्यानंतर माजी आमदार साहेबांना फोन करणारा व्यक्ती अमृतसरमधील मोहल्ला नेहरू कॉलनीमधील रहिवासी होता असं समोर आलं. अमन शर्मा असं संबंधित व्यक्तीचं नाव आहे.


अमन शर्माला पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.