महिलांना आता विमानातही विशेष जागा, खासगी एअरलाईन्स कंपनीचा मोठा निर्णय
इंडिगो एअरलाईने नुकतेच जाहीर केल्या प्रमाणे यापुढे इंडिगो एअरलाईन मधुन हवाईप्रवास करणाऱ्या महिलांना इतर महिला प्रवाशांच्या शेजारी जागा निवडता येणारे.
इंडिगो भारतातील सर्वात मोठी एअरलाईन आहे. त्यांनी नुकतेच जाहीर केल्या प्रमाणे यापुढे इंडिगो एअरलाईन मधुन हवाईप्रवास करणाऱ्या महिलांना इतर महिला प्रवाशांच्या शेजारी जागा निवडता येणारे.
विमान प्रवासा दरम्यान महिलांची सुरक्षा, आराम आणि दिलासा वाढवाण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या सुविधेची चाचणी इंडिगोने मे महिन्यातच सुरू केली होती, त्यामुळे महिलांना दुसऱ्या महिलांच्या शेजारील जागा निवडता आल्या. ज्या गुलाबी रंगाने चिन्हांकित केलेल्या होत्या.
हा पर्याय केवळ महिला प्रवाशांसाठीच जागा आरक्षित करताना दिसतो. इंडिगो एअरलाइनच्या सिस्टममध्ये बुकिंग करताना प्रवाशांनी त्यांचे लिंग ओळखणे आवश्यक असते. इंडिगो चे सीईओ, पिटर एल्बर्स यांनी सी.एन.बी.सी च्या "स्ट्रीट साइन्स एशिया" ला अहवाल दिला. त्यात त्यांनी सांगितलं की, या उपक्रमाला सर्वत्र सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. याशिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याला विशेष प्रतिसाद मिळाला असला तरी यामुळे वादविवादही झाले, काहींनी तुम्ही भेदभाव करत आहात असे म्हटले.
२०२३ ला एअर इंडियामध्ये प्रवासा दरम्यान एका मद्यधुंद पुरुष प्रवाशाने महिला प्रवाश्यावर लघवी केल्याची घटना घडली होती, यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला होता. अशा अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. इंडिगोने हा नवीन पर्याय केवळ महिला प्रवाशांसाठी विमान प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनविण्याचा हेतूने उपलब्ध केल्याचे ठामपणे सांगितले आहे.
गेल्या काही काळापासून पुरुष प्रवाशांच्या अयोग्य वर्तनाच्या घटना वाढत आहेत. याचा परिणाम होऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी निश्चितपणे सांगितलेले नाही. याबाबत ऑनलाइन वादविवाद सुरू आहे. काही लोक महिला सुरक्षितेचा विचार करून याचे समर्थन करत आहेत, तर काहींनी लिंग ओळख आणि भेदभाव यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.